विद्यापीठातील शिवपुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:24+5:302021-04-28T04:27:24+5:30
या सुशोभीकरणातील कामाचा पहिला टप्पा गेल्यावर्षी पूर्ण झाला आहे. त्यात बगीच्याच्या चार बाजूंनी पुतळ्यापर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. ...
या सुशोभीकरणातील कामाचा पहिला टप्पा गेल्यावर्षी पूर्ण झाला आहे. त्यात बगीच्याच्या चार बाजूंनी पुतळ्यापर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या मार्गांच्या बाजूला नक्षीकाम केलेले घडीव दगड लावण्यात आले आहेत. सध्या सुशोभीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. त्यामध्ये बगीच्याच्या बेसाल्ट खडकाचे रेलिंग होणार आहे. त्यासह उद्यानामध्ये स्प्रिंकलर बसविला जाणार आहे. विद्युत रोषणाई केली जाईल. लँडस्केप गार्डनअंतर्गत याठिकाणी विविध रंगांची फुले असणारी आकर्षक फुलेझाडे लावण्यात येणार आहेत. जूनपूर्वी सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे आहे. त्यादृष्टीने या विभागाकडून सध्या काम करण्यात येत असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मंगळवारी दिली.
फोटो (२७०४२०२१-कोल-विद्यापीठ सुशोभीकरण) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील शिवपुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे.