चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय : पार्श्वनाथ नांद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:46 PM2017-08-27T16:46:27+5:302017-08-27T16:58:24+5:30

कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले.

Beautiful coordination of painting and film: Parsvnath Nandre | चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय : पार्श्वनाथ नांद्रे

चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय : पार्श्वनाथ नांद्रे

googlenewsNext
ठळक मुद्देचिल्लर पार्टीतर्फे बालचित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणचित्रकला स्पर्धेत १७00 विद्यार्थी सहभागीकार्यक्रमात विश्व शिंदे याचा सत्कारचिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत हॅपी फीट

कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले.


चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी शाहू स्मारक भवन येथे हॅपी फीट हा बालचित्रपट दाखविण्यात आला. याच कार्यक्रमात चळवळीमार्फत कोल्हापूर महानगरपालिकेतील शाळेसाठी घेण्यफात आलेल्या बालचित्रकला स्पधेर्चे बक्षीस वितरण पार्श्वनाथ नांद्रे यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नांद्रे यांनी आपला चित्रकलेचा प्रवास उलगडला. चिल्लर पार्टीच्या ओंकार कांबळे याने प्रास्तविक भाषणात चिल्लर पार्टीच्या हेतूची माहिती दिली. विशाल चव्हाण याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. छायाचित्रकार जयसिंग चव्हाण यांच्या हस्ते नांद्रे यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. साक्षी सरनाईक हिने आभार माने तर अनुजा बकरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी रविंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विश्व शिंदे याचा सत्कार


सुदैवा फुटबॉल क्लबतर्फे दिल्ली येथे होणाºया प्रशिक्षणासाठी १५ वषार्खालील गटात निवड झालेल्या कोल्हापूरातील विश्व विजय शिंदे या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा चिल्लर पार्टीतर्फे पार्श्वनाथ नांंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बालचित्रकला स्पधेर्तील विजेते विद्यार्थी

सावली देवरुखकर, उज्वला सकट, स्वाती सोनटक्के, सेजल परिहार, जिया मुजावर, शिल्पा बोडेकर, प्रथमेश मोरे, प्रणित पटील, विनायक कांबळे, स्नेहल बडवे, यश लाड, रोहन सुतार, ज्ञानेश्वर तपशी, अनिकेत सोनवणे, साक्षी जाधव, नारायणी सहानी, अनिसा मणेर, अमृता केंगार, प्रेम लोहार, मोनिका नाईक, अथर्व निकम, रेहान बागवान, श्वेता साळवी, मंदार असबे, सोहम पोवार, अबरार गवंडी, झैनाब शेख.

चित्रकला स्पर्धेत १७00 विद्यार्थी सहभागी


या बाल चित्रकला स्पर्धेत महानगरपालिकेच्या १७00 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पधेर्तील बक्षीस विजेत्या विद्यार्थ्याच्या चित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनाच्या आवारात प्रदर्शित करण्यात आले होते.

 

Web Title: Beautiful coordination of painting and film: Parsvnath Nandre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.