शिवमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

By admin | Published: February 26, 2017 12:49 AM2017-02-26T00:49:42+5:302017-02-26T00:49:42+5:30

आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचा कार्यक्रम : कलागुणांच्या उधळणी; आजही रंगणार सोहळा

Beautiful inauguration of Shivamohotsav | शिवमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

शिवमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

Next

कोल्हापूर : ‘इतनी बेचैन होके तुमसे मिली’, ‘बिन तेरे’, या हिंदी चित्रपटांतील सदाबहार गीते सादर करीत संज्योती जगदाळे हिने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झालाच पण नंदेश उमाप यांनी सादर केलेल्या ‘एक शिवाजी राजा’ या गीतावर श्रोत्यांच्या टाळ्या पडल्या, तर एकापाठोपाठ सादर होणाऱ्या मराठी-हिंदी गीतांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली जात होती, निमित्त होते शिवमहोत्सवाचे.
शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे विद्यापीठातील लोककला केंद्रात शनिवारी शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मराठी-हिंदी गाण्यांचा आणि कॉमेडीचा ‘यूथफूल तडका’ या कार्यक्रमाने रंगत आणली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज गरज आहे. शिवाजी महाराज यांचे नियोजन व शिस्त युवकांनी आत्मसात करावी. या महोत्सवातून मनोरंजनासोबतच नवीन कलाकार घडण्यास मदत होत आहे. व्हाईस आॅफ इंडिया फेम संज्योती जगदाळे ‘हा हंसी बन गये हम’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. बहारदार हिंदी गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. पाठोपाठ सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप यांनी मराठी गीते सादर करून सर्वांना डोलण्यास भाग पाडले. त्यांच्या सादरीकरणानंतर महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबीने तर कार्यक्रमास एका वेगळ््याच उंचीवर नेऊन ठेवले. आकर्षक विद्युतरोषणाई, हाऊसफुल्ल सभागृहाने आणि बहारदार गीतांनी शनिवारची सायंकाळ शिवमहोत्सवातील अविस्मरणीय ठरली. याप्रसंगी विद्यीपाठाचे बी.सी.यु.डी. संचालक प्रा. डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, सचिव डॉ. चांगदेव बंडगर, मंजित माने, नितीन पाटील, अ‍ॅड. सचिन आवळे, विश्वास माने, योगेश माने, विशाल कांबळे, डॉ. सरोज बीडकर यांच्यासह विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Beautiful inauguration of Shivamohotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.