धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:01 AM2018-08-01T01:01:52+5:302018-08-01T01:02:37+5:30

गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने

The beauty of the sculpture blossomed from the disenchanted relief: The attention of the tourists is highlighted | धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

Next

कृष्णा सावंत ।
आजरा : गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्प तुडुंब भरला आहे. चहूबाजूने असलेला डोंगर, धरणाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटलेली असल्याने चालूवर्षी प्रकल्पाचे सौंदर्य भलतेच खुलले आहे. प्रकल्पापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत ३०० हेक्टरमध्ये पाणी साठल्याने प्रकल्पाला समुद्राचे स्वरूप आले आहे.

प्रकल्पाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटली आहे. भात रोपांचे मोठे वाफे हिरवाईने प्रकल्पावरून पाहताना मनमोहरून जाते. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे पर्यटक अल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. यावर्षीच्या फुललेल्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, मुंबई, गोवा, पुणे येथील पर्यटक प्रकल्पाचा आस्वाद घेत आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी आणि शंभर टक्के पुनर्वसनासाठी आवंडी, रायवाडा आणि गावठाणवाडी (आताचा चित्रानगर) येथील धरणग्रस्तांनी १९९२ पासून सन २००० पर्यंत संघर्ष केला. त्यामुळे चित्रीच्या सौंदर्याच्या समृद्धीबरोबरच पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार फुलला.

कर्नाटकातील संकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळाले. त्यामुळे चित्री धरणग्रस्तांच्या त्यागामुळे चित्रीचे सौंदर्य नटलेच, सोबत अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली.

तालुक्यातील पाच हजार हेक्टर बहरले
चित्री प्रकल्पाचा आजरा तालुक्याला कमी लाभ झाला; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील पाच हजार हेक्टर शेती ओलिताखाली येऊन सर्वसामान्य शेतकºयांचे जीवन फुलले. आजरा, गडहिंग्लज आणि कर्नाटकातील शेतकºयांचे जीवनमान २२५ धरणग्रस्तांच्या त्यागामुळे खºया अर्थाने फुलले.

इटे ते प्रकल्पापर्यंत रस्त्याची गरज
इटे फाटा ते चित्री प्रकल्पापर्यंत चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसह पर्यटकांनाही यात्रा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होण्याची गरज व्यक्त होत आहे.

रोजगार निर्मितीला संधी
प्रकल्पामुळे चित्रीचे सौंदर्य व अनेकांचे जीवनमानही नटले आहे. चित्रीवर येणाºया पर्यटकांची संख्या पाहता रोजगार निर्मितीला संधी आहे. या ठिकाणी हॉटेल, विश्रामगृह, चहा-नाष्टा सेंटर, आदी व्यवसायांना चालना मिळू शकते.

Web Title: The beauty of the sculpture blossomed from the disenchanted relief: The attention of the tourists is highlighted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.