वडगावात हाॅस्पिटलविरोधात भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:14+5:302021-06-05T04:18:14+5:30

आज सकाळी संजीवनी मेडिकल माॅलपासून वडगाव शिवसेनेच्या वतीने भीक मागत आंदोलन करत हाॅस्पिटलकडे आले. कुडाळकर हाॅस्पिटलसमोर बसून भीक मागण्यात ...

Begging agitation against hospital in Wadgaon | वडगावात हाॅस्पिटलविरोधात भीक मांगो आंदोलन

वडगावात हाॅस्पिटलविरोधात भीक मांगो आंदोलन

Next

आज सकाळी संजीवनी मेडिकल माॅलपासून वडगाव शिवसेनेच्या वतीने भीक मागत आंदोलन करत हाॅस्पिटलकडे आले. कुडाळकर हाॅस्पिटलसमोर बसून भीक मागण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहराध्यक्ष व नगरसेवक संदीप पाटील यांनी केले.

यावेळी तक्रारदार नितीन जयसिंग जाधव म्हणाले, या हाॅस्पिटलने बिल पूर्ण भरून घेतले आहे. मात्र पावती कमी रकमेची दिली आहे. मानसिक त्रास दिला आहे. तक्रार झाल्यानंतर ऑडिटला बिल पाठविले.

संदीप पाटील म्हणाले, पीपीई किटचे १२ हजार आकारणी करण्यात आली आहे. याचे सर्व रुग्णांवर विभाजन केले पाहिजे. भरमसाठ औषधे लिहून दिली जातात. लेखी सात तर तोंडी २० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे तक्रारदारावर भीक मागण्याची वेळ आली आहे. न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा लढा सुरू राहिल. हाॅस्पिटलच्या विरोधात टप्प्याने आमचा लढा चालू राहणार आहे. तसेच शहरातील अन्य हाॅस्पिटलविरोधात रुग्णाला मनमानी बिलांच्या तक्रारी असतील तर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी एकत्रित भीक मागून जमा झालेली रक्कम हाॅस्पिटलसमोर ठेवण्यात आली. यावेळी सागर साखळकर, रोहन सुनगार, विशाल पाटील, उमेश पाटील, विशाल दोरकर, भूषण सालकर, शालोम वाडेकर, नितीन जाधव, शकील पटवेगार आदी सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलकांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत जमाव करून घोषणाबाजी केली, अशी शासकीय फिर्याद पोलीस नाईक अशोक जाधव यांनी दिली.

हाॅस्पिटलच्या वतीने हाॅस्पिटलची विनाकारण बदनामी व त्रासाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

00000

फोटो कॅप्शन पेठवडगाव : येथील हाॅस्पिटल विरोधात भीक मांगो आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संदीप पाटील, सागर साखळकर, रोहन सुनगार, नितीन जाधव, विशाल पाटील, भूषण सालकर आदी सहभागी झाले होते. (छाया. संतोष माळवदे)

Web Title: Begging agitation against hospital in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.