महारक्तदान शिबिरास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:37+5:302021-04-29T04:18:37+5:30

इचलकरंजी : कोरोना संकटामुळे संपूर्ण राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने ...

Beginning of blood donation camp | महारक्तदान शिबिरास सुरूवात

महारक्तदान शिबिरास सुरूवात

Next

इचलकरंजी : कोरोना संकटामुळे संपूर्ण राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने श्री महेश नवयुवक मंडळाने शहरात ३० एप्रिलपर्यंत विविध भागात महारक्तदान शिबिर सुरू केले आहे. तरी रक्तदात्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कृष्ण मुंदडा व राधेश्याम झंवर यांनी केले आहे.

‘आयजीएम’ परिसरात मर्क्युरी दिवे

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालय आवारात काही वर्षांपासून विद्युत खांबावर बल्ब नसल्याने तेथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. रुग्ण व नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी रुग्णालयास भेट देऊन सोळा विद्युत खांबांवर मर्क्युरी दिव्यांची सोय करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अ‍ॅँटीजेन टेस्टिंगची सुविधा

इचलकरंजी : रोटरी क्लबच्या वतीने दाते मळा येथे ‘कोरोना रॅपिड अ‍ॅँटीजेन टेस्टिंग’ ची सुविधा करण्यात आली आहे. याचे उद्घाटन अध्यक्ष अभय यळरुटे यांनी केले. सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत हे टेस्टिंग होणार आहे. सदरचे टेस्टीिंग हे अल्प दरात उपलब्ध आहे. कार्यक्रमास सचिव दीपक निंगुडगेकर, पंकज कोठारी, रवींद्र नाकील, डॉ. रमेश जठार, आदी उपस्थित होते.

Web Title: Beginning of blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.