शिवसेनेच्यावतीने सीपीआरमध्ये वाटले हळद घातलेले दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:55+5:302021-05-18T04:24:55+5:30
कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने सीपीआर रुग्णालय परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हळद घातलेले दूध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. ...
कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने सीपीआर रुग्णालय परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हळद घातलेले दूध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हा उपक्रम सकाळी ९ ते १० या वेळेत पुढील सात दिवस सुरू राहणार आहे.
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दूध-हळद अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. त्यामुळे हे दूध रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिल्यामुळे इतर व्यक्तींना त्रास होणार नाही. त्यामुळे हा उपक्रम शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, डाॅ. व्यंकटेश पवार, बंटी सावंत, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे, संजय जाधव, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ, नीलेश जाधव, राजू इंदुलकर, आदी उपस्थित होते.
फोटो : १७०५२०२१-कोल-सीपीआर
ओळी : शिवसेनेच्या वतीने सीपीआरमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हळद घातलेले दूध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस. एस. मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी संजय पवार, बंटी सावंत, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते.