‘भोगावती’च्या संचालकांचे राजीनामे मागे
By admin | Published: October 13, 2015 11:30 PM2015-10-13T23:30:18+5:302015-10-13T23:47:04+5:30
नेत्यांची मध्यस्थी : अशोकराव पाटील, विश्वासराव पाटील यांची घोषणा
भोगावती : भोगावती सहकारी साखर कारखान्यात नोकरभरती करावी, अध्यक्ष, उपाध्यक्षांकडून कारखान्यातील कारभारात घेतले जात नाही, या प्रमुख कारणांसाठी संचालक पदाचा दिलेला राजीनामा नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर माघारी घेत आहोत, अशी घोषणा ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव दिनकर पाटील आणि विश्वासराव शंकरराव (आबा) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
विश्वास वरुटे यांच्या राजीनामा नाट्याने कारखान्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. याची दखल थेट आमदार मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संपतराव पाटील, ए. वाय. पाटील यांना घ्यावी लागली.
याबाबत अशोकराव पाटील म्हणाले, आम्ही काही कारणांसाठी राजीनामा दिला होता. याची दखल घेऊन आमदार हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील, संपतराव पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या आदेशाने हा राजीनामा माघारी घेतला आहे. यापुढील काळात आम्ही एकत्रित काम करून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, संचालक रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, पांडुरंग डोंगळे, बाबूराव हजारे, विश्वनाथ पाटील, अमर पाटील, संभाजी पाटील, राजू कवडे, कार्यकारी संचालक एस. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
नपाच वर्षांत मिळाले, चार दिवसांत घालविले
ऊस उत्पादकांना वेळेवर बिल, काही अंशी कामगारांना पगार वेळेवर देऊन या संचालक मंडळाने पाच वर्षांत सभासदांच्या मनात स्थान मिळविले होते. ते फक्त चार दिवसांत धुळीला मिळविल्याची खंत यावेळी अशोकराव पाटील यांनी व्यक्त केली.