एस.टी.ची हंगामी दरवाढ मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:46 AM2019-11-06T11:46:22+5:302019-11-06T11:48:50+5:30

एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढीच्या सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूलवाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे.

Behind the seasonal hike of ST | एस.टी.ची हंगामी दरवाढ मागे

एस.टी.ची हंगामी दरवाढ मागे

Next
ठळक मुद्देएस.टी.ची हंगामी दरवाढ मागेसहा नोव्हेंबरपासून नियमित तिकीटदराची अंमलबजावणी

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढीच्या सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूलवाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपासून एस.टी.चे नियमित तिकीट दर आकारण्यात येत असल्याचे एस.टी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा दिवाळीच्या सुट्टीत २५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ही दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज एस. टी.ला सुमारे दोन कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.

एस.टी.च्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन ) बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट १० टक्के दरवाढ करण्यात आली होती. या काळात एस.टी.च्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एस.टी. महामंडळाने प्रवाशांचे आभार मानले आहेत.
 

 

Web Title: Behind the seasonal hike of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.