बेळगाव : चव्हाणांसह महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काळी निशाणे दाखविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:03 PM2018-05-04T15:03:19+5:302018-05-04T15:03:19+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांना समिती काळे निशाणे दाखवून निषेध करणार आहे.
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांना समिती काळे निशाणे दाखवून निषेध करणार आहे.
चव्हाण यांच्यासह अमित देशमुख, सतेज पाटील हे नेते बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. समिती विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचार करू नये, यासाठी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी गुरुवारी प्रयत्न केले.
नेत्यांना भेटून विनंती केली आहे, तरीही काँग्रेस नेते समितिविरोधी प्रचाराला बेळगाव आणि खानापुरात आले तर, काळी निशाणे दाखवून निषेध करण्याचा इशारा मराठी भाषकांनी दिला आहे.
सकाळी चव्हाण हे येळ्ळूर येथे पदयात्रा काढणार होते, मात्र विरोध लक्षात घेता ते बेळगावला दुपार पर्यंत पोचले नव्हते, चार वाजता बेनकनहळळी येथे कार्यक्रमाअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे