बेळगाव : म्हादई येथील कळसा भांडुरा पाणी वाटप वाद चिघळला, शेतकऱ्यांच्या उत्तर कर्नाटक बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:37 AM2017-12-27T11:37:39+5:302017-12-27T11:44:27+5:30
कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे.
बेळगाव : म्हादई येथील कळसा भांडुरा पाणी वाटप वादावरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्तीसह बैलहोंगल आणि बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीत बंद पुकारला आहे. या तिन्ही तालुक्यातील शाळा कॉलेजना सुट्टी देखील देण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकात बंदच्या पार्श्वभूमीवर विश्वेश्वरय्या विद्यापीठाच्या बी इचा एक विषयाचा परिक्षेचा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे.
बेळगावातही बंदचा परिणाम
बेळगावकडून हुबळी-धारवाडकडे जाणाऱ्या बसेस राष्ट्रीय महामार्गावरच रोखण्यात आल्या असून याचा काही प्रमाणात बेळगाव मार्केटवरही परिणाम झाला आहे. याशिवाय बेळगावहून महाराष्ट्र आणि गोव्याकडे जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या असल्याने त्याचा त्रास गोवा आणि महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना होत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील बस सेवाही ठप्प झाल्याने स्थानिक प्रवाशांनाही हाल सोसावे लागले आहेत