आजऱ्यातील कुंभार बांधव मूर्ती तयार करण्यासाठी बेळगाव, कोकणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:33+5:302021-07-23T04:16:33+5:30
कोकणात प्रतिवर्षी मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात येतात. सात, अकरा, एकवीस दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. आजरेकर यांनी ...
कोकणात प्रतिवर्षी मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात येतात. सात, अकरा, एकवीस दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. आजरेकर यांनी केलेल्या आकर्षक व रेखीव गणेश मूर्तींना प्रत्येक वर्षी मागणी असते. आजरेकर कुंभार बांधव ज्या त्या गावात जाऊन स्वतंत्र घर भाड्याने घेऊन त्याच ठिकाणी मुक्काम करतात व गणेशमूर्ती तयार करीत असतात. चालू वर्षीही गणेशमूर्ती तयार करणारे कुंभार बांधव दाखल झाले आहेत.
चौकट : आजऱ्यातील गणेशमूर्तींना साताऱ्यातूनही मागणी
आजऱ्यातील गणेशमूर्ती कारागीर आनंदा कुंभार यांनी मातीच्या व शाडूच्या एक फूट उंचीच्या दोन हजार मूर्ती तयार करून साताऱ्याला पाठविल्या आहेत. गेल्या वर्षी साताऱ्यातून आजऱ्याच्या गणेशमूर्तींना मागणी होती, त्यानुसार तयार केलेल्या गणेशमूर्ती साताऱ्याला पाठविल्या आहेत.
फोटो ओळी - आजऱ्यातील कुंभार बांधवांनी कोकणात तयार केलेल्या शाडू व मातीच्या गणेशमूर्ती. (श्रीहरी येळेकर) क्रमांक : २२०७२०२१-गड-०१