बेळगाव, सिग्नल गोवाची आगेकूच कायम नगराध्यक्ष चषक फुटबॉल: मिरज,यवतमाळ पराभुत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:45 AM2018-11-19T11:45:57+5:302018-11-19T11:48:31+5:30
गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरु असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुसर्या दिवशी सिग्नल गोवा व बेळगाव फ्रेंडसने आपली आगेकूच कायम
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरु असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुसर्या दिवशी सिग्नल गोवा व बेळगाव फ्रेंडसने आपली आगेकूच कायम ठेवली.येथील एम.अार.हायस्कूलच्या मैदानावर प्रकाशझोतात ही स्पर्धा सुरु आहे.
रोमांचक सामन्यात यवतमाळच्या फ्रेंडस क्लबने निपाणी फुटबॉल अॅकडमीला २ - १ असे नमविले. निपाणीच्या साहेबखानने बाराव्या मिनिटाला उत्क्रष्ठ गोल करुन संघाचे खाते उघडले. पाठोपाठ चौदाव्या मिनीटाला यवतमाळच्या शुभम तावडेने जोरदार फटक्याद्वारे गोल नोंदवुन बरोबरी साधली. उत्तरार्धात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघानी शर्थीचे प्रयत्न केले.
४८ व्या मिनिटाला यवतमाळच्या जहांगिर शिवराजने निर्णायक गोलद्वारे घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राहिली.
बेळगाव फ्रेंडसने आपली घौडदौड कायम ठेवीत मिरज युनायटेडला १ - ० असे पराजित केले मिरजेचा आघाडीपटू अमोल वाघमारेने पुर्वाधात मिळालेल्या दोन संधी वाया घालवल्या फ्रेंडसच्या आमिल बेपारीचा उत्तरार्धातील गोल निर्णायक ठरला.
सिग्नल गोवाने नवोदित यवतमाळचा दुसऱ्या फेरीत ५ - ० असा पराभव केला. सिग्नलचा पवन ठाकुर व विष्णु यांनी प्रत्येकी दोन तर निखिल सिंगने एक गोल करुन विजयात वाटा उचलला.
*उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव..।
आजच्या दिवसातील सामनवीर म्हणुन आमिल बेपारी (बेळगाव), शाहरुख पिंजारी (यवतमाळ) तर लढवय्या खेळाडू म्हणुन विवेक कुंभार (मिरज), प्रशांत आजरेकर (निपाणी) यांना गौरविण्यात आले.
फोटो ओळी... गडहिंग्लज येथील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यात मिरज युनायटेड व बेळगाव फ्रेंडस संघाच्या खेळाडूत फुटबॉलवर ताबा मिळविण्यासाठी झालेल्या चढाओढतील एक क्षण. ( छायाचित्र -मजिद किल्लेदार )