‘इंग्लिश मेडियम’च्या २५० शाळांची घंटा आजपासून वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:31+5:302021-08-17T04:30:31+5:30

राज्य शासनाने गेल्या आठवड्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमधील वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही कारणास्तव पुन्हा वर्ग ...

The bells of 250 English medium schools will ring from today | ‘इंग्लिश मेडियम’च्या २५० शाळांची घंटा आजपासून वाजणार

‘इंग्लिश मेडियम’च्या २५० शाळांची घंटा आजपासून वाजणार

googlenewsNext

राज्य शासनाने गेल्या आठवड्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमधील वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही कारणास्तव पुन्हा वर्ग प्रत्यक्षात भरविण्याचा निर्णय स्थगित केला. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन जिल्ह्यातील विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील इंग्लिश मेडियम स्कूलमधील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, अकरावी आणि बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार आहेत. यापूर्वी जुलैमध्ये या शाळांतील इयत्ता आठवी, नववी, दहावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने इयत्ता आठवी ते दहावीच्या धर्तीवर उर्वरित इयत्तांचे वर्ग देखील प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी पालकांकडून वारंवार सुरू होती. पालकांनी संमतीपत्र दिल्याने इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करत असल्याचे कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष महेश पोळ यांनी सोमवारी सांगितले.

चौकट

सर्व इयत्तांचे वर्ग सुरू होणे आवश्यक

‘आयसीएमआर’ने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका नसल्याचे सांगितले आहे. लसीकरणाचे प्रमाणही चांगले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. त्यामुळे सर्व इयत्तांचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्यास शासनाने परवानगी देणे आवश्यक असल्याचे इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रदेश संयोजक ललित गांधी यांनी सांगितले.

चौकट

जिल्हा परिषद शाळांना आदेशाची प्रतीक्षा

जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप राज्य शासनाकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. त्यामुळे शाळांना शासन आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: The bells of 250 English medium schools will ring from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.