खंडपीठ लढ्यासाठी कायमस्वरुपी कृती समिती नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:38+5:302021-02-07T04:23:38+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठ लढ्यासाठी सर्वसमावेशक कायमस्वरुपी कृती समिती नेमणे, त्याचे अध्यक्षपद हे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडेच ...

The bench will appoint a permanent action committee for the fight | खंडपीठ लढ्यासाठी कायमस्वरुपी कृती समिती नेमणार

खंडपीठ लढ्यासाठी कायमस्वरुपी कृती समिती नेमणार

Next

कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठ लढ्यासाठी सर्वसमावेशक कायमस्वरुपी कृती समिती नेमणे, त्याचे अध्यक्षपद हे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडेच राहील तसेच मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्यासाठी मोजक्याच सदस्यांनी जाण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्र व बार गोवा कौन्सिलचे अध्यक्ष वसंतराव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व कृती समितीचे निमंत्रक ॲड. रणजित गावडे होते.

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी गेली ३६ वर्षे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा जिल्ह्यातील प्रतिनिधींची बैठक कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये झाली. कायमस्वरुपी कृती समितीवर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे तीन सदस्य निमंत्रक राहतील, सहाही जिल्ह्यांतील अध्यक्ष कमिटीवर असावेत, असाही ठराव करण्यात आला.

यावेळी सदस्य ॲड. विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे, ज्येष्ठ विधीज्ञ महादेवराव आडगुळे यांनी मत मांडले. या खंडपीठबाबत राज्य शासन आणि मुख्य न्यायमूर्तींवर दबाव निर्माण करण्यासाठी सहा जिल्ह्यांतून ठराव जमा करावेत, जिल्ह्यातील तीन मंत्री खंडपीठसाठी सकारात्मक आहेत, त्यांचा लाभ उठवावा, अशाही सूचना मांडण्यात आल्या.

या बैठकीत सातारा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमरसिंह भोसले, अशोक पाटील, राजेंद्र मंडलिक, शब्बीर आलासे (मिरज), इचलकरंजी बारचे उपाध्यक्ष विवेक तांबे, अरुण पवार (विटा), विजयसिंह पाटील, फारुक कोतवाल (मिरज), सर्जेराव खोत, जयकुमार अराध्ये, वडगाव बार अध्यक्ष उदय महाजन आदींनी मत मांडले.

शासन, उच्च न्यायालयाचाच अल्टीमेटम द्यावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घ्यावी, त्यातूनही मागणी मान्य नाही झाली तर राज्य शासन आणि उच्च न्यायालयाला अल्टीमेटम द्यावा. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलवरील तीन सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करावा, खंडपीठ मागणीसाठी पेटून उठले पाहिजे, अशीही भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

फोटो नं. ०६०२२०२१-कोल-खंडपीठ मिटींग

ओळ : कोल्हापुरात खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील प्रतिनिधींची बैठक शनिवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये झाली. या बैठकीत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष वसंतराव भोसले यांनी मार्गदर्शन केेले. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे, विवेक घाटगे, महादेवराव आडगुळे आदी उपस्थित होते.

Web Title: The bench will appoint a permanent action committee for the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.