बेंदूर फोटो ओळी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:17+5:302021-06-26T04:17:17+5:30
१) तुझ्याच रंगात न्हहातो... कोल्हापुरात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या बैलांची ...
१) तुझ्याच रंगात न्हहातो...
कोल्हापुरात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या बैलांची मनोभावी पूजा करण्यात आली. पंचगंगा नदी घाटावर बैलांची सजावट करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अक्षरश: स्पर्धा लागली होती. चिमुकला आपल्या बैलाच्या अंगावर विविध रंग टाकून त्याला अधिक आकर्षित करण्यात मग्न होता. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर) (छाया- आदित्य वेल्हाळ)
२) बैलांच्या शिंगांबरोबरच त्याच्या अंगावरही विविध रंग दिले होते. वाघासारखे रंगवलेल्या बैल पंचगंगा पदी घाटावर आकर्षण होते. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी युवकांची गर्दी झाली होती. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०१) (छाया- आदित्य वेल्हाळ)
३) बैलांची चित्तथरारक प्रात्यक्षिकेही यावेळी पाहवयास मिळाली. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)
४) बैलाची रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर त्याला मायेने कुरवाळून चिमुकल्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०३) (छाया- आदित्य वेल्हाळ)
५) कोल्हापुरात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्याचेही पडसाद बैलांच्या रंगरंगोटीत उमटले. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०४) (छाया- आदित्य वेल्हाळ)
६) पंचगंगा नदीघाटावर आकर्षक बैल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०५) (छाया- आदित्य वेल्हाळ)