महापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:34 AM2021-02-23T11:34:54+5:302021-02-23T11:36:45+5:30

Banking sector KolhapurNews- कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणार नसल्याचे शासनाने सांगितले होते. कर्जमाफीच्या वरील रकमेची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Benefit of interest concession to flood affected farmers also | महापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ

महापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ

Next
ठळक मुद्देमहापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणार नसल्याचे शासनाने सांगितले होते. कर्जमाफीच्या वरील रकमेची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची सोमवारी बैठक झाली. यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. महापुरातील बाधित ९२ हजार २०१ शेतकऱ्यांना २६८ कोटींची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. या कर्जमाफी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते.

ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी उर्वरित पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर तीन टक्के व्याज परतावा योजनेप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणे आवश्यक असल्याबाबत बँकेच्या ३१ ऑक्टोबर २०२० च्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव केला होता. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेतही याबाबत ठराव झाला होता. बँकेच्या पाठपुराव्यानंतर सरकारने अंशत: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Benefit of interest concession to flood affected farmers also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.