बहिरेवाडीत ५० जणांना निराधार योजनेच्या अनुदानाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:46+5:302021-04-07T04:25:46+5:30
वारणानगर-बहिरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत बहिरेवाडी व एच.आर.जाधव सहकार उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील मंजूर झालेल्या ५० लाभार्थ्यांना संजय गांधी ...
वारणानगर-बहिरेवाडी (ता.पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत बहिरेवाडी व एच.आर.जाधव सहकार उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील मंजूर झालेल्या ५० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान रकमेचे वाटप व इतर गरजूंना शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला.एच.आर.जाधव सहकार समूहामार्फत गुढीपाडव्यानिमित्त यात्रा ठेव अंतर्गत दूध उत्पादकांना ४ लाख तर भिशीधारक सभासदांना २० लाख असे सुमारे २५ लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समूहाचे संस्थापक व वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव यांनी बोलताना दिली.
येथील बहिरेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गरीब,गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमांतून विधवा,परिपक्त्या,गरजू व दिव्यांग अशा ५० हून अधिक लाभार्थींना अनुदान रक्कम,नवीन रेशनकार्ड व उत्पादकांना यात्रा ठेव रकमेचे वाटप दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, शुभलक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई जाधव,लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योजनेसाठी सहकार्य केल्याबद्दल प्रशांत सिंहासने (कोडोली ),कोतवाल दिलीप खाडे व गुणवंत बिरंबोळे आदींचा सत्कार एच.आर.जाधव यांच्या हस्ते झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील,राजेंद्र जाधव,संपत कणसे, विजय कावळे,हरी जाधव,बळवंत येवले, देवानंद जाधव,पांडुरंग पाटील,प्रशांत पाटील,जयश्री जाधव, धनश्री जाधव यांच्यासह समूहातील संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.गुणवंत बिरंबोळे यांनी आभार मानले.
..
फोटो ओळी -
बहिरेवाडी येथे ग्रामपंचायत व एच.आर.जाधव सहकार समूहाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचे वाटप वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शिरीषकुमार जाधव,सुधाताई जाधव, दीपक पाटील,राजेंद्र जाधव, दयानंद जाधव व पदाधिकारी.
फोटो -