जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:09 AM2019-08-20T01:09:20+5:302019-08-20T01:10:04+5:30
ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.
कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या १ हेक्टर (अडीच एकर) आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने पूरग्रस्त शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.
जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ४८० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यातील १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. उर्वरित पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात ६ लाख ६० हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यातील ८४ टक्के म्हणजेच सुमारे साडेपाच लाख शेतकरी हे एक हेक्टरच्या आतील आहेत. राज्य सरकारने सोमवारी पूरबाधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ३ लाख १३ हजार ६१० शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे.
महापुरामुळे ऊस, भात, सोयाबीन, भुईमुगाची पिके संपली आहेत. सर्वाधिक नुकसान ऊसपिकाचे झाले असून शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सरकारी यंत्रणेकडून पंचनामे सुरू आहेत, पण त्यातून मिळणारी भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान याची सांगड घालता येत नाही. त्यामुळे बॅँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत शेतकरी असतानाच सरकारने कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलासा दिला आहे.
कर्जमर्यादेच्या निकषाचा अडसर?
बॅँकिंग धोरणाच्या अधीन राहून वाटप केलेले कर्जच माफ होणार आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कर्जमर्यादेपेक्षा अधिक वाटप केलेल्या कर्जदारांची अडचण आहे, त्याचबरोबर मध्यम मुदत व खावटी कर्जाचे काय? हेही प्रश्न अधांतरीच राहणार आहेत.
जिल्ह्यातील खातेदार :
एकूण खातेदार : ६ लाख ६० हजार
१ हेक्टरच्या आतील : ५ लाख ५४ हजार
१ ते २ हेक्टरपर्यंत : ७९ हजार ४००
२ हेक्टरपेक्षा अधिक : २६ हजार ६००