नाट्य चळवळीसाठी सर्वतोपरी सहकार्य : राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:16+5:302021-03-22T04:22:16+5:30
जयसिंगपूर : नाटकांमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असते. मराठी रंगभूमीने महाराष्ट्राला अनेक गुणवंत कलाकार उपलब्ध करून दिले आहेत. ...
जयसिंगपूर : नाटकांमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असते. मराठी रंगभूमीने महाराष्ट्राला अनेक गुणवंत कलाकार उपलब्ध करून दिले आहेत. नाटकांमुळे नवोदित कलाकारांची निर्मिती होत असते. नाट्य चळवळीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवास सुरुवात झाली. नाट्यशुभांगी जयसिंगपूर व नगरपरिषदेच्या सांस्कृतिक समितीच्यावतीने सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी स्वागत सुभाष टाकळीकर यांनी केले. यावेळी कानेटकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री यड्रावकर यांच्याहस्ते झाले. यावेळी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील प्रयोग अमोघ कुलकर्णी यांनी, तर ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकातील प्रयोग निखिल आणेगिरीकर यांनी सादर केला.
यावेळी संजय हळदीकर, मुकुंद पटवर्धन, नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले, तर शिरीष यादव यांनी आभार मानले.
फोटो - २१०३२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ -
जयसिंगपूर येथे ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले.