पाळीव प्राणी पाळताय सावधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:29+5:302021-02-07T04:23:29+5:30

कोल्हापूर : शहरातील पाळीव प्राण्यावर आता महापालिकेची करडी नजर असणार आहे. रस्त्यावर पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास थेट मालकाकडून १५० ...

Beware of keeping pets ... | पाळीव प्राणी पाळताय सावधान...

पाळीव प्राणी पाळताय सावधान...

Next

कोल्हापूर : शहरातील पाळीव प्राण्यावर आता महापालिकेची करडी नजर असणार आहे. रस्त्यावर पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास थेट मालकाकडून १५० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याची कडक अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार असल्याची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी दिली आहे.

देशात कोल्हापूर शहर स्वच्छतेमध्ये पहिल्या १० मध्ये येण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दर रविवारी स्वच्छता मोहीम करणारी बहुदा कोल्हापूर महापालिका ही एकमेव आहे. असे असले तरी शहरातील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य कायम आहे. कुत्रा, मांजर, गाई, म्हैसी, आदी पाळीव प्राण्याची विष्टा रस्त्यावर पडलेली असते. महापालिकेने यावर वाचक बसण्यासाठी पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकास १५० रुपये दंड आकारणीची कारवाई सुरू केली आहे. याचबरोबर व्यावसायिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून १५० रुपये, नागरिकांनी नदी, नाल्याच्या ठिकाणी कचरा टाकल्यास १५०, तर ओला व सुका कचरा वर्गीकरण केला नसल्यास १०० रुपये दंड केला जाणार आहे. महापालिकेचे आरोग निरीक्षक, मुकादमांची प्रभागात यावर नजर असणार आहे.

Web Title: Beware of keeping pets ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.