वादळ व चक्रीवादळाची खबरदारी घ्या : महापौरांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:39 PM2020-06-03T16:39:58+5:302020-06-03T16:42:22+5:30
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. तेंव्हा कोल्हापूर शहरवासियांनी यासदंर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
कोल्हापूर : निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. तेंव्हा कोल्हापूर शहरवासियांनी यासदंर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मोठ्या झाडाखाली थांबण्याचे टाळावे, घरातील इलेक्ट्रीकल उपकरणे, गॅस व्हॉल्व बंद ठेवावेत, आपले घर असुरक्षित असल्यास त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, मोडकळीस आलेल्या घरापासून तसेच विद्युततारा, खांब यापासून शक्यतो दूर रहा, आपली जनावरे व पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा, असे आवाहन महापौरांनी या पत्रात केले आहे.