भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:32 AM2018-05-26T01:32:05+5:302018-05-26T01:32:05+5:30

 Bhadenna Kleinchit is the backing of Chief Minister: Vaman Meshram | भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

भिडेंना क्लीनचीट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पाठिंबाच : वामन मेश्राम

Next
ठळक मुद्देगारगोटी येथे परिवर्तन यात्रा; खऱ्या हल्लेखोरांना अटक करा

गारगोटी : भीमा कोरेगाव दंगलीतील खºया हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी परिवर्तन यात्रा काढून सरकारला जाग आणणार आहोत. पाचशे शूरवीरांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून भीमा कोरेगाव घडविला, आम्ही तर लाखोंच्या संख्येत आहोत, त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोहर भिडेंना क्लीनचीट देऊन दंगलीला एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे, अशी घणाघाती टीका बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.
गारगोटी येथे आयोजित परिवर्तन यात्रेच्या समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार तर प्रमुख उपस्थितीत तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळकाका देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे होते.
मेश्राम पुढे म्हणाले, या देशात जनावरांची जातनिहाय पशुगणना होते पण ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. ती जातनिहाय जनगणना करून अबकड पद्धतीने संख्येवर आधारित वर्गवारी करून आरक्षण लागू करण्यात यावे. ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान सुरू करावे .
प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी गेली चाळीस वर्षे अविरत कष्ट घेणाºया वामन मेश्राम यांनी ही चळवळ निर्णायक टप्प्यावर आणली आहे. याचे सर्वस्वी श्रेय हे मेश्राम यांचे आहे.
यावेळी प्रा. बाळकाका देसाई, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात्रेस बिद्रीचे माजी संचालक सुनील कांबळे, राजू काझी, बबन कांबळे, युवराज पाटील, पिंटू गुरव, दयानंद म्हेत्तर, के. के. कांबळे, नामदेव कांबळे, प्रवीण कांबळे, मानसिंग देसाई, सुरेश कांबळे, अमित कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शरद बोरवडेकर यांनी, तर आभार सदानंद म्हेत्तर यांनी मानले.

परिवर्तन रॅलीच्या समारोप समारंभात वामन मेश्राम यांनी संबोधित केले. यावेळी बाळकाका देसाई, अर्जुन कुंभार, सौ. मेश्राम, प्रकाश पाटील, संतोष मेंगाणे, आदी उपस्थित होते.

Web Title:  Bhadenna Kleinchit is the backing of Chief Minister: Vaman Meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.