शेतकरी कामगार पक्षातर्फे उद्यापासून ‘भाई दाजीबा देसाई व्याख्यानमाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:25 AM2021-03-16T04:25:22+5:302021-03-16T04:25:22+5:30
कोल्हापूर : येथील भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि बेळगावमधील भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. ...
कोल्हापूर : येथील भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि बेळगावमधील भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. १७) ते शुक्रवार (दि. १९) दरम्यान ‘भाई दाजीबा देसाई व्याख्यानमाला’ होणार आहे. माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यातील व्याख्याने रोज सायंकाळी पाच वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात होणार आहेत.
या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान बुधवारी सांगलीतील ज्येष्ठ कामगार नेते ॲड. अजित सूर्यवंशी यांचे ‘भाई दाजीबा यांचे जीवन व कार्य’ या विषयावर होईल. अध्यक्षस्थानी शेकापचे कोल्हापूर शहर चिटणीस बाबूराव कदम असतील. दुसरे व्याख्यान गुरुवारी इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या प्रसाद कुलकर्णी यांचे ‘बदलते राजकारण व समाजकारण’ या विषयावर होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील असतील. संशोधक डॉ. अरुण शिंदे यांच्या ‘सत्यशोधकी पत्रकारिता’ या विषयावरील व्याख्यानाने गुरुवारी या व्याख्यानमालेचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी असणार आहेत. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बाबूराव कदम यांनी दिली.
फोटो (१५०३२०२१-कोल-दाजीबा देसाई (माजी खासदार)