मंगळवार पेठेतील भैरवनाथ पालखी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:27+5:302021-03-01T04:27:27+5:30
कोल्हापूर : मंगळवार पेठ साठमारी गल्लीतील अराध्य दैवत व रावणेश्वर क्षेत्र प्रतिपालक श्री भैरवनाथ देवाची पालखी उत्सव सोहळा भक्तिपूर्ण ...
कोल्हापूर : मंगळवार पेठ साठमारी गल्लीतील अराध्य दैवत व रावणेश्वर क्षेत्र प्रतिपालक श्री भैरवनाथ देवाची पालखी उत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुलाल-खोबऱ्यांची उधळण व चांगभलंच्या गजराने परिसर दुमदुमला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले निर्देश पाळत हा सोहळा भाविकांच्या अलोट उत्सवात पार पडला.
माघ पौणिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे श्री भैरवनाथ आणि श्री काळभैरवनाथ सोडळा परिसरातील भक्त मंडळातर्फे केला जातो. यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने देवाच्या पालखी प्रदक्षिणावर मर्यादा आल्या, तरीही भाविकांनी शासनाचे निर्देश पाळत हा सोहळा भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पाडला. साठमारी परिसरातील श्री भैरवनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई केली होती. गाभारा फलांनी सजवला होता. शनिवारी दिवसभर देवाच्या दर्शनासाठी तसेच पुरणपोळ्याच्या नैवेद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दिवसभर धार्मिक विधीनंतर मर्यादित स्वरूपात पालखी सोहळा पार पडला. पुजारी वैभव माने यांनी उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले.
पालखीचे पूजन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी यांच्यासह उद्योगपती मिलिंद धोंड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, बापूसाहेब साळोखे, माजी नगरसेवक आनंदराव पायमल, माणिक मंडलिक, अजित मोरे तसेच नरेंद्र पायमल, प्रसाद पुजारी आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो नं. २८०२२०२१-कोल-भैरवनाथ पालखी
ओळ : मंगळवार पेठेतील श्री भैरवनाथ पालखी उत्सव सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट केली होती.