वाघापुरात बाळूमामांचा भंडारा उत्सव साध्यापध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:41+5:302021-04-09T04:24:41+5:30
सदगुरू बाळूमामा नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला बाळूमामांची सालकृंत महापूजा बांधली. बाळूमामांच्या गाभाऱ्यात जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरास ...
सदगुरू बाळूमामा नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला बाळूमामांची सालकृंत महापूजा बांधली. बाळूमामांच्या गाभाऱ्यात जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरास कळे (ता. पन्हाळा ) येथील दीपक बुरुड यांनी नेत्रदीपक विद्युत रोषणाई केल्यामुळे
मंदिराचा मंडप, दीपमाळ विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. तसेच आदमापूर गावातील पूजा कांबळे व जयश्री पाटील या मुलींनी बाळूमामा मंदिरासमोर नेत्रदीपक अशी सुरेख रांगोळी विविध रंगात काढली आहे .सकाळी पहाटे पाच वाजता आरती होऊन भंडारा उत्सवाची सांगता झाली.
फोटो ओळी : (१) आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील बाळूमामा मंदिर परिसरात शुकशुकाट.
(२) भंडारा उत्सव रद्द झाल्यामुळे बाळूमामा मंदिरात पुजारी व मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत भंडारा-भाकणूक करताना कृष्णा डोणे-महाराज, वाघापूरकर. (३) बाळूमामा देवालयात गाभाऱ्यातील जरबेरा व इतर फुलांची सजावट.
(सर्व छायाचित्रे -बाजीराव जठार, वाघापूर)