भंडारी, खुटाळे विजयी
By admin | Published: November 16, 2014 11:40 PM2014-11-16T23:40:36+5:302014-11-16T23:50:02+5:30
१२५ मल्लांचा सहभाग : वारणा मानधनधारक कुस्ती स्पर्धा
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना व वारणा दूध संघ यांच्यावतीने आयोजित मानधनधारक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात अभिजित बबन भंडारी (नरंदे, ता. हातकणंगले) व अमित गोविंदराव खुटाळे (रा. खुटाळवाडी ता. शाहूवाडी) यांनी विजय मिळविले. या स्पर्धेत १२५ मल्लांनी भाग घेतला होता.
शास्त्री भवनमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर वारणा समूहाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी सर्व सहभागी स्पर्धक मल्लांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
दूध संघाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले, संघाचे संचालक शिवाजीराव जंगम, सचिव के. एस. वाले, कारखान्याचे सचिव बी. जी. सुतार यांच्या हस्ते सर्व मानधनधारक विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात
आला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून वस्ताद प्रकाश पाटील, चंद्रकांत शिंदे,
ईश्वरा पाटील, संदीप पाटील,
दिलीप महापुरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
स्पर्धेतील विजेते असे : वारणा साखर कारखाना
खुला गट - प्रथम - अभिजित बबन भंडारी (नरंदे), द्वितीय - अक्षय आनंदराव पाटील (अंबप)
४८ किलो - प्रथम - नागेश राजाराम बोने (पारगाव), द्वितीय- सूरज शंकर खडके (बोरपाडळे)
५२ किलो - प्रथम- वैभव महादेव यादव (शिरोली), द्वितीय - शुभम बाबासो चौगुले (शिये)
५७ किलो - प्रथम - बजरंग रघुनाथ गायकवाड (पारगाव), द्वितीय - विक्रम नामदेव महापुरे (शहापूर)
६२ किलो - प्रथम - प्रमोद भीमराव कावळे (बहिरेवाडी), द्वितीय - शुभम भानुदास पाटील (सागाव)
६८ किलो - प्रथम - अमोल हिम्मत पाटील (पारगाव), द्वितीय - संतोष रामचंद्र जाधव (सातवे)
७४ किलो - प्रथम - संभाजी धनाजी पाटील (सांगाव), द्वितीय - संतोष सर्जेराव पाटील (बोरपाडळे)
८४ किलो-प्रथम- सचिन तुकाराम पाटील (पारगाव), द्वितीय - श्रीमंत जालिंदर भोसले (मिणचे).