भुदरगड तालुक्यात भावी आमदारांची फलकावर ‘हवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:40 PM2018-11-13T23:40:18+5:302018-11-13T23:40:22+5:30

शिवाजी सावंत। लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : भुदरगड तालुक्यात सध्या चार जिल्हा परिषद मतदारसंघापैकी एक विद्यमान सदस्य तर तीन ...

Bharargad talukas 'air' on the boards of future MLAs | भुदरगड तालुक्यात भावी आमदारांची फलकावर ‘हवा’

भुदरगड तालुक्यात भावी आमदारांची फलकावर ‘हवा’

Next

शिवाजी सावंत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यात सध्या चार जिल्हा परिषद मतदारसंघापैकी एक विद्यमान सदस्य तर तीन सदस्यांचे नातलग विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या इच्छुकांनी निवडणूक लढवल्यास ही ऐतिहासिक घटना ठरणार आहे. या नेत्यांच्या उतावीळ कार्यकर्त्यांकडून आतापासून भावी आमदार म्हणून गावोगावी डिजिटल फलकाद्धारे हवा करण्यात येत आहे.
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जि. प. मतदारसंघातील विद्यमान सदस्य जीवन पाटील, पिंपळगाव जि. प. मतदारसंघातील रोहिणी आबिटकर यांचे दीर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, गारगोटी जि.प. सदस्य रेश्मा देसाई यांचे पती राहुल देसाई, पाटगाव जि. प. सदस्य स्वरूपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव अशा चारही मतदारसंघापैकी एक सदस्य आणि दोन सदस्यांचे पती तर एक दीर असा योगायोग घडून आला आहे.
२0१९ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी करण्याच्या हेतूने राहुल देसाई, जीवन पाटील, सत्यजित जाधव हे प्रथमच विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर आमदार आबिटकर हे आपल्या तिसºया वेळच्या उमेदवारीच्या तयारीत आहेत.
1 राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य जीवन पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून शक्ती प्रदर्शन केले आहे. आता थांबायचे नाही! असे म्हणत उघड प्रचार सुरू केला आहे. गत बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार केपी पाटील यांनी उमेदवारी डावलल्यावर त्यांनी चक्क आमदार आबिटकर यांच्या गोटात शिरून संस्था गटातून उमेदवारी केली. यामध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. पण आता काहीही झाले तरी विधानसभा लढवायचीच या उद्देशाने ते कामाला लागले आहेत. मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नाहीतर मिळेल तो पक्ष नाहीच जमले तर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
2 गत जि.प.च्या निवडणुकीत राहुल देसाई यांनी पत्नी रेश्मा देसाई यांना उमेदवारी मिळवून विजय खेचून आणला. माजी आमदार बजरंग देसाई यांनी जनमानसात निर्माण केलेली प्रतिमा आणि राहुल देसाई यांनी गटाचे नेतृत्व करत सांभाळलेला जनसंपर्क या निवडणुकीत त्यांना उपयोगी पडला. ती निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवली पण सध्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. या जोरावर ते आगामी विधानसभा लढवण्यासाठी मतदारसंघात दौरे सुरू आहेत.
3 पिंपळगाव जि.प. मतदारसंघातील विद्यमान सदस्या रोहिणी आबिटकर यांचे दीर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. माजी जि प सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी स्वत:च गारगोटी जि प मतदारसंघात उमेदवारी न करता दुसºया मतदारसंघात उमेदवारी करून निवडुन येण्याची किमया केली. सद्या विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
4 पाटगाव जि.प. मतदारसंघात माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा आणि माजी उपसभापती सत्यजित जाधव यांच्या पत्नी स्वरूपाराणी जाधव यांनी बाजी मारली. दिनकरराव जाधव यांना मानणारा गट या विधानसभा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे आमदार आणि जेष्ठ नेते, अनेक वर्षे बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे माजी आमदार जाधव यांनी धुरा सांभाळली आहे. सध्या काँग्रेस पक्षातून ते आपले पुत्र सत्यजित जाधव यांना विधानसभेला उतरवण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस पक्षात माजी आमदार जाधव तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार आहे. न मिळाल्यास जाधव अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत.

Web Title: Bharargad talukas 'air' on the boards of future MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.