भारत बंदला गांधीनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:19 AM2020-12-09T04:19:03+5:302020-12-09T04:19:03+5:30
गांधीनगर परिसरातील वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, वसगडे, उचगाव, न्यू वाडदे, सरनोबतवाडी या गावांत बंद पाळण्यात आला. गांधीनगरमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने ...
गांधीनगर परिसरातील वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, वसगडे, उचगाव, न्यू वाडदे, सरनोबतवाडी या गावांत बंद पाळण्यात आला. गांधीनगरमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
दरम्यान, करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरून मोटारसायकलची रॅली काढून केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच गांधीनगर येथील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. यावेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, तालुका उपप्रमुख पोपट दांगट, विनायक जाधव, वीरेंद्र भोपळे, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, बाबुराव पाटील, किशोर कामरा, अजित चव्हाण, सुनील पारपाणी, दीपक अंकल, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
०८ गांधीनगर बंद
फोटो ओळ- कृषी कायद्याविरोधात मंगळवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गांधीनगरमध्ये व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. (छाया : अनिल निगडे). २) कृषी कायद्याविरोधात बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरमधून मोटारसायकल रॅली काढून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला.