फार्मसी परीक्षेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज’चे धवल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:24+5:302021-03-30T04:13:24+5:30
कोल्हापूर : एप्रिल-मेमध्ये घेण्यात आलेल्या बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी धवल ...
कोल्हापूर : एप्रिल-मेमध्ये घेण्यात आलेल्या बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळविले. शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये तीन विद्यार्थिनींनी स्थान पटकाविले.
या कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात ६९ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये, तर नऊ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ऋतुजा दत्तात्रय चौगुले हिने द्वितीय, पूनम सुभाष जाधव हिने पाचवा, तर तन्वी श्रीरंग पवार मेढे यांनी दहावा क्रमांक पटकविला. त्यांना प्राचार्य डॉ. एच.एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम.एस. भाटिया, परीक्षा विभागप्रमुख डॉ. डी.ए. भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, संचालक डॉ. एच.एम. कदम यांनी अभिनंदन केले.
फोटो (२९०३२०२१-कोल-ऋतुजा चौगुले (फार्मसी), पूनम जाधव (फार्मसी), तन्वी पवार मेढे (फार्मसी)