भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार- भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:28 AM2018-03-09T01:28:08+5:302018-03-09T01:28:08+5:30

कोल्हापूर : भातुकलीचा खेळ म्हटले की, डोळ्यांसमोर त्या खेळातील छोटी-छोटी भांडी दिसतात; पण हीच छोटी-छोटी मातीची भांडी आज बदलत्या काळात दिवाणखान्याची शोभा वाढविणारी ठरत आहेत

Bhatukali Bhatts gave the help to the world - Bhatukali Bhatkha gave help to the world | भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार- भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार

भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार- भातुकलीच्या भांड्यांनी दिला संसाराला हातभार

Next
ठळक मुद्देदिवाणखान्याची शोभा वाढली; परदेशातही पोहोचली भांडी

तानाजी पोवार ।
कोल्हापूर : भातुकलीचा खेळ म्हटले की, डोळ्यांसमोर त्या खेळातील छोटी-छोटी भांडी दिसतात; पण हीच छोटी-छोटी मातीची भांडी आज बदलत्या काळात दिवाणखान्याची शोभा वाढविणारी ठरत आहेत. या शोभेच्या भांड्यांसह स्वयंपाकघरातही वापरासाठीच्या भांड्यांना कोल्हापूरसह पुण्या-मुंबईतून वाढणारी मागणी विचारात घेऊन सुमन चंद्रकांत बारामतीकर यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली गरज व्यवसायात बदलली आहे. त्यामुळे एकेकाळचा भातुकलीच्या भांड्याचा व्यवसाय आता त्यांच्या संसाराला हातभार लावणारा ठरत आहे.

अवघ्या अकरावीपर्यंत शिक्षण झालेल्या व कळंबा कारागृहासमोर चंद्रकांत भोसले कॉम्प्लेक्समध्ये राहणाºया सुमन बारामतीकर यांच्या घरची परिस्थिती बेताची असताना त्यांना रेल्वेस्थानकावर चहासाठी विकल्या जाणाºया ‘कुल्हड’ने भुरळ पाडली. आपल्याकडे ‘कुल्हड’ या मातीच्या भांड्याची कल्पना नवीन असली तरी त्याला भविष्यात चांगली मागणी मिळेल, असे एका नातेवाइकाने सांगितल्याने बारामतीकर यांनी ‘कुल्हड’ बनविण्याची संकल्पना डोक्यात घेतली. वरद महिला बचत गटाच्या दहाजणींना त्याचे महत्त्व पटवून सर्वांनी गट करून ‘कुल्हड’ बनविण्याचे खानापूर (कर्नाटक) येथे प्रशिक्षण घेतले;

पण ‘कुल्हड’ची संकल्पना रुजली नाही. पुढे मातीच्या पणत्याही बनविल्या; पण ‘कुल्हड’चा
उपयोग चहा पिण्याऐवजी स्वयंपाकघरामध्ये दही बनविण्यासाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मी खानापूर (कर्नाटक) येथे जाऊन तेथे पुन्हा महिलांचा गट तयार करून ‘कुल्हड’सह पणती, पेन स्टॅँड, घंटी, चहाची किटली, गणपतीची मूर्ती, आकर्षक भांडी या दिवाणखान्यात शोभा वाढविणाºया मातीच्या वस्तू बनविण्यास सुरुवात केली. त्यालाही प्रतिसाद मिळाला. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मातीच्या बनविलेल्या फिल्टरला कोल्हापूरकरांनी पसंती दर्शविली. सुरुवातीच्या काळात अवघे ५०० रुपये गुंतवणूक केलेल्या व्यवसायात आता दोन लाखांहून अधिक खेळते भांडवल झाले आहे, असे सांगून सुमन बारामतीकर म्हणाल्या, माझ्या प्रत्येक यशामध्ये स्वयंसिद्धा संस्थेसह कुटुंबांचे मोठे योगदान आहे.

दिवाणखान्याची शोभा वाढविणाºया वस्तूंत दिवसेंदिवस भर पडत गेली. आता शोकेसमध्ये ठेवल्या जाणाºया आकर्षक गणेशमूर्तीसह भातुकलीच्या भांड्यांनाही मागणी वाढली आहे. भातुकलीच्या खेळातील मातीचा कुकर, खलबत्ता, कपबशी, चूल, पातेले, प्लेट ही भांडी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. दिवाणखाना, हॉल, आदी ठिकाणी या शोभेच्या वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी होऊ लागल्याने त्याला कोल्हापूरसह पुणे-मुंबई येथून मोठी मागणी होत आहे. बारामतीकर यांनी बनविलेली भांडी आता परदेशातही पोहोचली आहेत. याशिवाय स्वयंपाकघरात वापरासाठीच्याही मातीच्या भांड्यांची मागणी वाढू लागल्याने पूर्वीची असणारी गरज आज व्यवसायात बदलली आहे. त्यामुळे ही भातुकलीची मातीची भांडीच संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रमुख साधन बनले आहे.

खणखणीत आवाजाची भांडी
स्वयंपाकघरातील भांडी बनविण्यासाठी लाल, काळी, गाळाची माती तसेच रेती यांची आवश्यकता असते.
ही बनविण्यासाठीच्या भांड्यासाठी शाडू, लाल माती, तलावाच्या मातीची; तर शोपीससाठीच्या भांड्यांसाठी वस्त्रगाळ केलेल्या गाळाच्या मातीची आवश्यकता असते. ही माती इलेक्ट्रिक चाकावर ठेवून छोटी-छोटी भांडी बनविली जातात.ही भांडी भाजण्यासाठी भट्टीत ९५० डिग्री तापमान ठेवले जाते; तरच त्या भांड्यांचा आवाज खणखणीत येतो. त्यांना बाजारात मागणीही मोठी होते.

Web Title: Bhatukali Bhatts gave the help to the world - Bhatukali Bhatkha gave help to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.