भोगावती शिक्षण मंडळाने ‘नॅक’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:44+5:302021-04-17T04:22:44+5:30
भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेने यापुढे ॉ‘नॅक’ने सुचवलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार वाटचाल करावी, त्यामुळे विद्यार्थ्यांचे ...
भोगावती :
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेने यापुढे ॉ‘नॅक’ने सुचवलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार वाटचाल करावी, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी केले.
‘नॅक’कडून भोगावती महाविद्यालयाला ए ग्रेड मानांकन मिळाले, त्याबद्दल भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, संचालक मंडळ व सर्व स्टाफचा भोगावती साखर कारखान्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिवाजीराव पाटील, टी.एम.चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत संचालक प्रा.सुनील खराडे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ संचालक ए.डी.पाटील, ए.डी.चौगले, बी.आर.पाटील, शिवाजी कारंडे व सर्व संचालक, कार्यकारी संचालक के.एस.चौगले, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले. आभार संचालक बी.आर.पाटील यांनी मानले.
फोटो ओळी :
भोगावती शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा कारखान्याच्यावतीने सत्कार करताना कृष्णराव पाटील, यावेळी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, ए.डी.पाटील, प्रा. सुनील खराडे,जयसिंग हुजरे व मान्यवर.