भुदरगड तालुका काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:15+5:302021-07-14T04:30:15+5:30
गारगोटी : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात ...
गारगोटी : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
तालुका काँग्रेस कार्यालयापासून ते पाच कि.मी. परिसरातील पेट्रोल पंपापर्यंत सायकल रॅली काढून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई , बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, संजय गांधी समितीचे सदस्य भुजंगराव मगदूम, सरपंच सुरेश नाईक, कार्याध्यक्ष ॲड संजय देसाई, संदीप चव्हाण, अमर बरकाळे,धनाजी कुरळे, सुशांत माळवी, उदय पाटील,सुधीर गोडसे, हृषिकेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
१३ भूदरगड काँग्रेस
फोटो ओळ
महागाई विरोधात काँग्रेसच्यावतीने गारगोटी येथील क्रांतीज्योतीजवळ आंदोलन करताना सचिन घोरपडे,शामराव देसाई,संदीप चव्हाण,भुजंगराव मगदूम आदी.