जयसिंगपुरात शिवपुतळा प्रकल्पाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:23+5:302021-05-15T04:21:23+5:30
जयसिंगपूर : शिवप्रेमींची प्रतीक्षा लागून असलेल्या शिवपुतळा प्रकल्पाचे शुक्रवारी अक्षय तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भूमिपूजन ...
जयसिंगपूर : शिवप्रेमींची प्रतीक्षा लागून असलेल्या शिवपुतळा प्रकल्पाचे शुक्रवारी अक्षय तृतीया आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भूमिपूजन करण्यात आले. नगराध्यक्षा डॉ. नीता माने व उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठीच्या नियोजित जागेचे भूमिपूजन झाले. यावेळी शिवगर्जनांनी प्रकल्प स्थळ दणाणून गेले.
शहरात गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जावा, यासाठी शिवप्रेमींकडून प्रयत्न सुरू होते. पुतळा उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी व नगरपालिकेकडून पाठपुरावा झाला. याचाच भाग म्हणून शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत पुतळा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अमरसिंह निकम, विठ्ठल मोरे, संभाजी मोरे, राहुल बंडगर, बजरंग खामकर, सर्जेराव पवार, शैलेश चौगुले, महेश कलकुटगी, गुंडाप्पा पवार, संजय पाटील- कोथळीकर, प्रेमला मुरगुंडे, शीतल गतारे, दादा पाटील- चिंचवाडकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, शैलेश आडके, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब वगरे, चंद्रकांत जाधव, अभिजित भांदिगरे, शंकर नाळे, सागर मादनाईक, स्वप्नील सावंत यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
चौकट - महामार्गालगत पुतळा प्रकल्प
नगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून या प्रकल्पासाठी ३ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भव्य अश्वारूढ पुतळा, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, असा प्रकल्प सांगली- कोल्हापूर महामार्गालगत साकारला जाणार आहे.
चौकट -
जागा संपादनाचे काम अंतिम टप्प्यात : यड्रावकर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व म्युझियम उभारण्यासाठी पालिकेने शासनाकडे केलेल्या जागा नगर परिषदेच्या ताब्यात मिळण्याबाबतचा पाठपुरावा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केल्यामुळे याला गती मिळाली आहे. जागा ताब्यात मिळण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर यांनी यावेळी दिली. मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो - १४०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळा उभारणीच्या जागेचे भूमिपूजन झाले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, चंद्रकांत जाधव, अमरसिंह निकम, अभिजित भांदिगिरे, सर्जेराव पवार यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.