दख्खनचा राजा जोतिबा मालिकेचे कोल्हापूर चित्रनगरीत भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 03:54 PM2020-08-24T15:54:28+5:302020-08-24T15:59:42+5:30
अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल.
कोल्हापूर : अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल.
चित्रनगरीत महेश कोठारे यांची नात छोट्या जीजाच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी स्वत: महेश कोठारे, नीलिमा कोठारे, आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कोठारे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील उपस्थित होते. महेश कोठारे यांचे कोल्हापूरशी खूप जुने व घट्ट नाते आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातून होते. आता त्यांच्या ह्यकोठारे व्हिजनह्ण या निर्मिती संस्थेतर्फे १५ सप्टेंबरपासून या नव्या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात होत आहे. जोतिबा देवस्थानदेखील कोल्हापुरात आहे; त्यामुळेच मालिकेचे चित्रीकरणही येथेच होत आहे. पुढील किमान तीन-चार वर्षे हे चित्रीकरण चालेल.
कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्य सेट लवकरच उभा राहणार असून तो प्रख्यात कलाकार संतोष फुटाणे हे साकारत आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. कोठारे यांच्या या नव्या मालिकेतून कोल्हापुरात हजारो तंत्रज्ञांना काम मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केली.
या नव्या पौराणिक मालिकेसाठी कोठारे व्हिजन कामाला लागली आहे. जोतिबाची भूमिका आणि यातील कलाकार यांबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी संतोष फुटाणे, अमर मोरे, अमेय हिंडलगे, स्टार प्रवाहच्या माधुरी पाटकर, अभिनेते आनंद काळे, महालक्ष्मी सिने सर्व्हिसचे मिलिंद अष्टेकर, सर्जेराव पाटील उपस्थित होते.