सिंगलसाठी गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाळेचे उद्या भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:44+5:302021-01-04T04:21:44+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार (५) रोजी सायंकाळी ४.३० वाजता ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार (५) रोजी सायंकाळी ४.३० वाजता चर्च रोडनजीकच्या खुल्या जागेत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दिली. गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन होईल. यावेळी ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर हे उपस्थित राहणार आहेत.
------------------------
२) गडहिंग्लजमध्ये माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषद व गडहिंग्लज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझी वसुंधरा अभियाना’चा प्रारंभ प्राचार्य एस. एन. देसाई यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला जलार्पण करून झाला.
यावेळी नगरपालिका शिक्षण मंडळाचे लिपिक अनिल गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. डी. काशिद, एस. डी. कांबळे, मंथन शिंदे, विनोद कांबळे, हरिष म्हेत्री, राजू शिंगे, दत्ता मांग आदी उपस्थित होते.
------------------------
३) ‘आकांक्षा’ची इन्स्पायर अॅवाॅर्डसाठी निवड
गडहिंग्लज : गडहिंग्लज हायस्कूलची विद्यार्थिनी आकांक्षा बंकट हिशोबकर हिची जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवाॅर्ड प्रदर्शनासाठी निवड झाली. तिला प्राचार्य एस. एन. देसाई, पर्यवेक्षक व्ही. डी. काशिद, एस. डी. कांबळे व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.