आरोग्य, पर्यावरण रक्षणासाठी सायकल राईड उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:19+5:302021-01-25T04:26:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा. प्लास्टिक वापरू नका, असे आवाहन करत पर्यावरणपूरक माझी ...

Bicycle ride activities for health, environmental protection | आरोग्य, पर्यावरण रक्षणासाठी सायकल राईड उपक्रम

आरोग्य, पर्यावरण रक्षणासाठी सायकल राईड उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा. प्लास्टिक वापरू नका, असे आवाहन करत पर्यावरणपूरक माझी वसुंधरा अभियानअंतर्गत वडगाव नगरपालिका, ट्रेल हंटर्सच्या वतीने ३५० हून अधिक सायकलस्वारांनी रॅली काढली. सकाळी पालिका चौकात सायकल प्रेमी नागरिक, मुले चौकात एकत्र आले. यावेळी स्वच्छता रथाचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी उपस्थितांना स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. त्यानंतर झेंडा चौकापासून रॅलीला सुरवात झालीण ही रॅली विजयसिंह यादव चौक, हनुमान रोड, कोल्हापूर रोडवरून डाॅ. सायरस पुनावाला स्कूलपर्यंत आली. त्यानंतर ही रॅली शिवाजी पुतळामार्गे पुन्हा पालिका चौकात आली.

उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, गट नेत्या प्रविता सालपे, शरद पाटील, संदीप पाटील, संतोष गाताडे, गुरुप्रसाद यादव, रमेश शिंपणेकर, सुनीता पोळ, शबनम मोमीन, अलका गुरव, डॉ. अभय पाटील, वीरेंद्र चौगुले, शैलेश पिसे, सुनील कोळेकर, अमोल बेलेकर, प्रवीण पाटील, विपुल वडगांवे, शिवराज जाधव, नेहूल शिंपणेकर आदींसह विविध ऑफरोड बायकर्स सायकल ग्रुपचे सदस्य तसेच पर्यावरण, सायकल प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

२४ वडगाव सायकल रॅली

फोटो ओळ : पेठवडगाव : येथील वडगाव नगरपालिका व ट्रेल हंटर्स सायकल ग्रुपच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानअंतर्गत आरोग्यासाठी सायकल चालवा असा संदेश देण्यासाठी सायकल राइड घेण्यात आली. यावेळी उपस्थित सायकल प्रेमी नागरिक (छाया: संतोष माळवदे )

----------

Web Title: Bicycle ride activities for health, environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.