ऊस दरात राज्यात ‘के. पी’च भारी, प्रतिटन ३४०७ रुपये दराची घोषणा 

By राजाराम लोंढे | Published: December 15, 2023 12:15 PM2023-12-15T12:15:55+5:302023-12-15T12:17:09+5:30

सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी

Bidri factory in Kolhapur announced the highest sugarcane price in the state at Rs 3407 per tonne | ऊस दरात राज्यात ‘के. पी’च भारी, प्रतिटन ३४०७ रुपये दराची घोषणा 

ऊस दरात राज्यात ‘के. पी’च भारी, प्रतिटन ३४०७ रुपये दराची घोषणा 

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०७ रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी २०७ रुपये देणार आहेत. हा दर उचल राज्यातील सर्वोच्च असून कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राज्यात ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे.

‘बिद्री’ साखर कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी आहे. मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात ८ लाख ८० हजार टनाचे गाळप केले होते. यावर्षी ‘स्वाभिमानी’ने ऊस दराचे आंदोलन सुरु केले, पण कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता.

मात्र, प्रचार सभांमधून ते सभासदांना आश्वासित करत होते. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने प्रतिटन ३३०० रुपये जाहीर केला आहे. त्यापेक्षा जादा दर जाहीर करुन ‘बिद्री’ने राज्यात आपणच ऊस दरात भारी असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

निवडणुकीतील शब्द खरा ठरवला

‘बिद्री’ची निवडणूक पंधरा दिवसापुर्वी झाली, या प्रचारादरम्यान सभासदांना अपेक्षेपेक्षा जादा दर देण्याचा शब्द कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिला होता. तो खरा ठरल्याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात आहे.

Web Title: Bidri factory in Kolhapur announced the highest sugarcane price in the state at Rs 3407 per tonne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.