‘बिद्री’ त राष्टÑवादी-भाजप एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:31 PM2017-09-16T15:31:24+5:302017-09-16T15:35:34+5:30
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस व भाजप आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपला २१ पैकी सहा जागा देणार असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या निवडणूकीत एकत्र येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत तीन-चार बैठका झाल्या, चर्चेअंती सहा जागा देण्यावर एकमत झाले. आता भाजपमध्ये गेलेली मंडळी कधी ना कधी आमच्या पॅनेलमध्ये होतीच. गेले वेळेला राजे विक्रमसिंह घाटगे, प्रवीणसिंह पाटील, विजयसिंह मोरे तर बजरंग देसाईही एकवेळ आमच्यासोबत होते, आता भाजपचे लेबल लावून सोबत आहेत, एवढाच फरक आहे.
जिल्ह्यातील सर्वात सक्षम ‘बिद्री’साखर कारखाना असून वाढीव सभासदांच्या गुंत्यामुळेच निवडणूक वेळेवर न झाल्यानेच प्रशासक आले. आता आम्ही निवडणूक ताकदीने लढवून जिंकणारच असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
पारदर्शक कारभार करत सक्षम आर्थिक स्थिती व कर्जमुक्त कारखाना केवळ के. पी. पाटील यांच्या मुळेच झाला. त्यामुळेच राजकारण व तत्वप्रणाली बाजूला ठेवून शेतकºयांच्या हितासाठी आम्ही एकत्र आल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.
स्वतंत्र लढण्याबाबत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पण साखर कारखान्याचे राजकारण हे सभासदांच्या संख्येवर असते. आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर तेरा-चौदा हजार मतापर्यंत गेलो असतो. असेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, तेरा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पारदर्शक व काटकसरीचा कारभार केल्यानेच कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली. आगामी काळात इथेनॉल , डिस्टीलरी प्रकल्पांची उभारणी करणार असून ऊस उत्पादन वाढीसाठी नियोजन करणार आहे.
कारखान्याची गाळप क्षमता पाच हजारावरून साडे सात हजार टन करणार असून कारखान्याच्या हितासाठी सरकारची मदत गरजेची असते, यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आघाडी केल्याचेही त्यांनी सांगितले. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’ चे संचालक बाबा देसाई, रणजीत पाटील, हिंदूराव शेळके, समरजीतसिंह घाटगे गटाचे यशवंत माने व प्रकाश पाटील उपस्थित होते.
विरोधकांत एक वाक्यतेचा अभाव
विरोधी आघाडीने आठ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता, पण तिथे नेत्यांची संख्या जास्त असल्याने एक वाक्यता नसल्यानेच दोन जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण राष्टÑवादी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही, कारखान्याची सत्ता केवळ राजकीय अड्डा करण्यासाठीच हवी असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.
स्थानिक कॉँग्रेस आघाडीसोबतच
‘आण्णा तुम्ही कॉँग्रेसचे की....’ अशी विचारणा केली असता. आपण कॉँग्रेस म्हणूनच आलो आहे. भुदरगड तालुक्यातील कॉँग्रेस ही राष्टÑवादी-भाजप आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती माजी आमदार बजरंग देसाई यांनी दिली.
‘बिद्री’त खरी लोकशाही!
शेतकºयांची स्वताचे दागिने विकून कारखान्याचा शेअर्स खरेदी केला आणि सहवीज प्रकल्प उभा राहिला. त्यांना अपात्र ठरविल्याने विरोधकांमध्ये ºहोष आहे. इतर कारखान्याचे सभासद बघितले तर प्र्र्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखे आहे, पण ‘बिद्री’ मध्ये ऊस घालणाºया प्रत्येकाला सभासद केले जात असल्याने खरी लोकशाही येथे असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.
पॅनेलची घोषणा २५ सप्टेंबरला
भाजपला सहा जागा मिळाल्या असल्या तरी त्या कोणत्या गटाती घ्यायच्या याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून ठरविल्या जातील. २५ -२६ सप्टेंबरला राष्टÑवादी-भाजप पॅनेलची घोषणा केली जाईल, असे हाळवणकर यांनी सांगितले.
मुरगूडकर घरातील पेच व्यवस्थीत सोडवू
कागल व भुदरगड तालुक्यात एकाच घरात दोन-दोन उमेदवार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर हाळवणकर म्हणाले, रणजीत पाटील व प्रवीणसिंह पाटील-मूरगूडकर यांच्याबाबत विचारत असाल तर हा पेच व्यवस्थीत सोडवू .