‘बिद्री’त ‘के. पी.’च ‘लई भारी’--चंद्रकांतदादा-मुश्रीफ ठरले किंगमेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:28 AM2017-10-11T00:28:49+5:302017-10-11T00:31:33+5:30

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत

In 'Bidri' P. 'Lai Heavy' - Chandrakant Dada-Mushrif became the Kingmaker | ‘बिद्री’त ‘के. पी.’च ‘लई भारी’--चंद्रकांतदादा-मुश्रीफ ठरले किंगमेकर

‘बिद्री’त ‘के. पी.’च ‘लई भारी’--चंद्रकांतदादा-मुश्रीफ ठरले किंगमेकर

Next
ठळक मुद्देसर्व २१ जागांवर दणदणीत विजयदिनकरराव जाधव-आबिटकर-मंडलिक आघाडीचा धुव्वार्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
दत्ता लोकरे
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑवादी-भाजप आघाडीने सर्व २१ जागा मोठ्या फरकाने जिंकून दणदणीत विजय मिळविला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडाला. सर्व उमेदवार सरासरी १६०० ते ४९०० च्या मताधिक्याने विजयी झाले.

राज्याच्या राजकारणात ज्या राष्ट्रवादीचा ‘भ्रष्टाचारवादी’ असा उल्लेख केला, त्याच पक्षाशी या निवडणुकीत भाजपने आघाडी केली होती; त्यामुळे हा नवाच फॉर्म्युला लोक कितपत स्वीकारतात याबद्दल उत्सुकता होती. सभासदांनी त्यावरून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून याच आघाडीस स्पष्ट बहुमत दिले. ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पदरी पराभव आल्याने भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच जागा घेऊन राष्टÑवादीसोबत निवडणूक लढविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. महसूलमंत्री पाटील यांच्या तालुक्यातील हा कारखाना असल्याने त्यांनी या निवडणुकीत व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लावली होती.

विरोधी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कारखान्यातील कारभारावर टीका केलीच; त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा यांना विधानसभा लढविण्याचे जाहीर आव्हान देऊन निवडणुकीत चांगलीच हवा तयार केली होती. त्यामुळे त्यांना चार-पाच तरी जागा मिळतील असे चित्र होते; परंतु त्यांच्या आघाडीस दारुण पराभवास सामोरे जावे लागले. प्रमुख विजयी उमेदवारांत माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विठ्ठलराव खोराटे, बाबासाहेब हिंदुराव पाटील यांचा समावेश आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर, विजयसिंह मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अपात्र सभासदांचा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

कारखान्याच्या वाढीव सभासदांचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासक नेमला होता. गेली दोन वर्षे कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासक नेमणुकीवरून भाजप व राष्टÑवादीमध्ये वाद झाला होता; परंतु हे दोन पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येऊन सत्ता काबीज केली. के. पी. पाटील यांच्या कारखाना चांगला चालविण्याच्या प्रतिमेचा फायदा या निवडणुकीत राष्टÑवादी-भाजप आघाडीला झाला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी रात्री दहा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला. या निवडणुकीसाठी रविवारी (दि. ८) चुरशीने ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदान झाले होते. मंगळवारी लोणार वसाहतीतील रामकृष्ण हॉल मध्ये मतमोजणी झाली.

गत निवडणुकीपेक्षा मताधिक्यात घट
गत निवडणुकीत राष्टÑवादीने स्वबळावर सर्व जागा जिंकत पाच ते सहा हजारांचे मताधिक्य घेतले होते. या वेळेला वाढीव सभासद असूनही त्यात घट झाली. विरोधी आघाडीने केलेली मोर्चेबांधणी, राष्टÑवादी आघाडीतून ऐनवेळी बाजूला गेलेले विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, जीवन पाटील, अशोक फराकटे, राजेखान जमादार यांच्यामुळे हा फटका बसला.

भाजप पहिल्यादांच ‘बिद्री’च्या सत्तेत
विजयी आघाडीत भाजपचे पाच संचालक आहेत. यांमध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार बजरंग देसाई यांचे प्रत्येकी दोन, तर जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे असे संचालक आहेत. या संचालकांच्या माध्यमातून भाजप ‘बिद्री’च्या सत्तेत पहिल्यांदाच गेला आहे.

संस्था गटाची विजयी सलामी
संस्था गटातील मतमोजणी सुरुवातीला घेण्यात आली. यामध्ये १०३६ पैकी १०३६ मते वैध ठरली. त्यांपैकी महालक्ष्मी आघाडीचे जगदीश पाटील यांना ५४२, तर राजर्षी शाहू आघाडीचे जीवन पाटील यांना ४९० मते मिळाली. संस्था गटातील निकालाने ‘महालक्ष्मी’ आघाडीने विजयी सलामी दिली.

निवडणूक यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी
गत निवडणुकीत दुसºया दिवशी सकाळी आठपर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते. या निवडणुकीत मतदानात वाढ झाल्याने त्यापेक्षा जादा वेळ लागेल, असा अंदाज होता; पण निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केल्याने रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही गोंधळ, गडबड व तक्रारी न होता सर्व निकाल जाहीर झाला.
 

Web Title: In 'Bidri' P. 'Lai Heavy' - Chandrakant Dada-Mushrif became the Kingmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.