कोल्हापुरात सतेज पाटील गटाला खिंडार; उचगावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:37 AM2023-12-02T11:37:28+5:302023-12-02T11:37:52+5:30

उचगाव : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगावमध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला. विजय गुळवे, ...

Big blow to Satej Patil group in Uchgaon kolhapur, Entry of supporters into BJP | कोल्हापुरात सतेज पाटील गटाला खिंडार; उचगावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापुरात सतेज पाटील गटाला खिंडार; उचगावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उचगाव : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगावमध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौघांनी पक्षप्रवेश केला. मंत्री पाटील, खासदार महाडिक आणि माजी आमदार महाडिक यांनी राजकीय गट-तट विचारात न घेता नेहमीच विकासाला साथ दिली आहे. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे यावेळी विजय गुळवे यांनी सांगितले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत, असे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले. 

सुडाचे राजकारण न करता सर्वसामान्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार लोकांना पटत आहे, अशा भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केल्या. सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका असल्यामुळे लोकांची साथ लाभत आहे, भविष्यात इतर गावांमधून अन्य काही प्रवेशही होणार असल्याचे अमल महाडिक यांनी सांगितले. 

यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, अनिल पंढरे, किरण घाटगे, अनिल शिंदे, एन. डी. वाईंगडे, राजू संकपाळ, उमेश पाटील, अभिजीत पाटील, दत्तात्रय तोरस्कर, राजेंद्र चौगुले, उमेश देशमुख, प्रवीण चव्हाण, सतीश मर्दाने, अनिल अवघडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Big blow to Satej Patil group in Uchgaon kolhapur, Entry of supporters into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.