चौकटबद्ध विचार बदलल्यास मोठ्या संधी -- चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:58 PM2019-07-08T19:58:36+5:302019-07-08T20:02:01+5:30

मुळात आपणच आपल्यावर लादून घेतलेली अनेक बंधने आहेत. ती बाजूला करून व्यापक विचार करण्याची सवय कोल्हापूरने लावून घेतली आहे. - चेतन नरके

Big opportunities for changing the boxed ideas | चौकटबद्ध विचार बदलल्यास मोठ्या संधी -- चेतन नरके

चौकटबद्ध विचार बदलल्यास मोठ्या संधी -- चेतन नरके

Next
ठळक मुद्दे तसे युवक मिळाल्यास मी त्यांना संधी देऊ शकतो.म्हणूनच मानसिकता बदलण्याची गरज आहे.

समीर देशपांडे।

गेली २० वर्षे विविध देशांमध्ये राहून मार्केटिंगचे काम करणारे चेतन नरके गेल्या वर्षी कोल्हापुरात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, संधी यांचा अभ्यास असणारे नरके यांनी शेतीमध्ये लक्ष घातले आहे. कोल्हापूरची जी बलस्थाने आहेत, त्यांवरच काम केल्यास चांगले भवितव्य असल्याची भूमिका असणाऱ्या चेतन नरके यांच्याशी संवाद.

प्रश्न : आपली शैक्षणिक कारकिर्द कशी घडली?
उत्तर : मी शिवाजी पेठेत राहणारा. एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, न्यू कॉलेजमधून बारावी सायन्स झाल्यानंतर ‘केआयटी’मधून बी.ई. प्रॉडक्शनचं पूर्ण केले. शिकागो येथून आयआयटी कॉलेजमधून एम. एस. कॉम्प्युटर सायन्सची पदवी संपादन केली. नंतर न्यूयॉर्क, लंडन येथून कॉम्प्युटर सायन्स आणि ‘एम.बी.ए.’चे शिक्षण पूर्ण केले.
 

प्रश्न : आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ?
उत्तर : शिक्षणानंतर लगेचच मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी कामाची संधी मिळाली. मार्स इन्कॉर्पोरेशन या कंपनीच्या १० देशांच्या नेटवर्कचे काम माझ्याकडे होते. अमेरिकेतील मेड जॉन्सन न्यूट्रिशियन्स, ब्रिटनमधील रॅकेट बेनकिझन या कंपन्यांमधूनकाम करताना २५ हून अधिक देशांमधील बाजारपेठेचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.

प्रश्न : पुन्हा कोल्हापुरात येण्याचा निर्णय कसा घेतला?
उत्तर : माझे वडील अरुण नरके आज ७६ वर्षांचे आहेत. ‘गोकुळ’ प्रकल्पाच्या विकासामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. कोल्हापूरसाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेनुसारच मी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मी कोल्हापुरात परतलो.

प्रश्न- नवे प्रयोग सुरू केलेत का?
उत्तर- सहा एकरत डेकोरेटिव्ह पामची लागवड केली आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे २०० कोटींची झाडे केरळहून आणली जातात. कोल्हापुरातच या झाडांचे उत्पादन करून शेतकऱ्यांना रोपे पुरवून त्यांच्याकडून ती खरेदीच्या प्रकल्प सुरु केला आहे.

ही बलस्थाने
शेती,फौंड्री उद्योग, कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोल्हापूरला इतर देशांमध्ये काम करण्यास मोठा वाव आहे. आपली ही सर्व बलस्थाने आहेत. याच बलस्थानांचा वापर करून या संधी साधण्याची गरज आहे. आज जगभरातील हिºयाला पैलू पाडण्याच्या व्यवसायात ८० टक्के हिºयांना थायलंड किंवा भारतीय कामगाराचा हात लागलेला असतो. थायलंडमध्ये चांगले इंग्रजी शिकविणाºया शिक्षकांची गरज आहे. तसे युवक मिळाल्यास मी त्यांना संधी देऊ शकतो.

मानसिकता बदला
तेच-तेच मी किती वर्षे करीत बसणार आहात? ४० वर्षांपूर्वीच्या आमदारांना रस्ते, गटारी करण्याला प्राधान्य होते; आजही जर आमचे आमदार, खासदार रस्ते आणि गटारी करण्यामध्येच गुंतले तर मग वेगळे धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या जिल्हला पुढे कसे घेऊन जाणार? म्हणूनच मानसिकता बदलण्याची गरज आहे.

Web Title: Big opportunities for changing the boxed ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.