‘प्रॅक्टिस रन’ला मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:01 AM2018-12-17T00:01:11+5:302018-12-17T00:01:25+5:30
कोल्हापूर : क्रीडानगरी म्हणून देशभरात गवगवा निर्माण केलेल्या करवीरनगरीत पहिल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यशानंतर दुसरे पर्व ६ जानेवारी २०१९ ला ...
कोल्हापूर : क्रीडानगरी म्हणून देशभरात गवगवा निर्माण केलेल्या करवीरनगरीत पहिल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यशानंतर दुसरे पर्व ६ जानेवारी २०१९ ला ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन,’ पॉवर्ड बाय माणिकचंद आॅक्सिरिचच्या रूपाने होत आहे. यासाठी रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठात सहभागी होणाऱ्या व मॅरेथॉनबद्दल आकर्षण असलेल्या सर्व धावपटूंकरिता ‘प्रॅक्टिस रन’ आयोजित केली होती. त्यात शेकडो जणांनी सहभाग घेतला. यानिमित्त नावनोंदणी करणाºयांना विशेष सवलतही देण्यात आली.
या पॅ्रक्टिस रनचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते
झाले. यावेळी ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक संजय पाटील (पश्चिम महाराष्ट्र वितरण), उपव्यवस्थापक संतोष साखरे (मनुष्यबळ व प्रशासन), आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या पर्वाच्या यशानंतर ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसºया पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सहभागी धावपटूंना धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी सकाळी साडेसहा वाजता शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात घेण्यात आलेली पाच किलोमीटरची प्रॅक्टिस रन मोठ्या उत्साहात पार पडली. विशेषत: सकाळच्या आल्हाददायक गारव्यातही शेकडो जणांनी सहभागी होत तिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात व्यावसायिक धावपटू, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, धावपटूंच्या संघटना, अधिकारी, विद्यार्थी यांचा समावेश होता. प्रारंभी मॅरेथॉन ट्रेनर सुरेश चेचर यांनी धावपटूंना धावणे सुलभ व्हावे, त्यातून जास्तीत जास्त स्टॅमिना राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. धावण्यापूर्वीचे सर्व प्रकारचे व्यायामही करून घेतले. सहभागी धावपटूंसाठी शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी व रन पूर्ण झाल्यानंतर फलाहाराचीही सोय करण्यात आली होती.
२० डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत
महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त वर्षांवरील) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटरची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटवर नावनोंदणी करावी किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा व नोंदणी करावी. नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे. महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
विशेष मार्गदर्शन
महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया धावपटूंकरिता रविवारी शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या प्रॅक्टिस रनपूर्वी मॅरेथॉन ट्रेनर सुरेश चेचर यांनी धावताना श्वासोच्छ्वास कसा करायचा, पायांच्या स्टेप्स कशा टाकायच्या, हातापायांच्या हालचाली कशा कराव्यात, गती वाढविण्यासाठी मान, पाठीचा कणा कसा ताठ ठेवावा, यासह धावण्यापूर्वीचे महत्त्वाचे व्यायामप्रकार व विशेष मार्गदर्शनही केले. याबाबत चेचर हे मेरी वेदर मैदानावर सराव करणाºया धावपटूंना ६ जानेवारीपर्यंत विशेष मार्गदर्शनही करणार आहेत.