बहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:59 AM2019-08-31T11:59:43+5:302019-08-31T12:00:35+5:30

बहिरेश्वर (ता. करवीर) येथे घराचे कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलत भावांत मारामारीचा प्रकार घडला. तिघांनी केलेल्या मारहाणीत सुभाष तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ आॅगस्टला हा प्रकार घडला.

In Bihareshwar, crimes committed by two families are mutual | बहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे

बहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे

Next
ठळक मुद्देबहिरेश्वरमध्ये दोन कुटुंबात हाणामारीपरस्परविरोधी गुन्हे

कोल्हापूर : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे घराचे कंपाउंड बांधण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलत भावांत मारामारीचा प्रकार घडला. तिघांनी केलेल्या मारहाणीत सुभाष तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ आॅगस्टला हा प्रकार घडला.

सुभाष दिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर आकाराम दिंडे, सचिन आकाराम दिंडे, आकाराम शंकर दिंडे (सर्व रा. बहिरेश्वर, ता. करवीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सागर दिंडे याने दिलेल्या तक्रारीनुसार सुभाष दिंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

करवीर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि संशयित सख्खे चुलतभाऊ आहेत. सुभाष दिंडे हे घराच्या कंपाउंडच्या भिंतीचे बांधकाम करत असताना, ‘तुझ्या कंपाउंडची भिंत आमच्या टेरेसपर्यंत का बांधली’, असा जाब विचारत शिवीगाळ केली. संशयित सागर दिंडेने काठीने मारहाण केली. अन्य दोघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. काही वेळाने परिसरातील दवाखान्यात उपचारासाठी गेले असता, त्या ठिकाणी संशयित सचिन दिंडे आला. त्याने झालेल्या जखमेवर पुन्हा मारून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.

दरम्यान, याप्रकरणी सागर आकाराम दिंडे याने परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित तुकाराम दिंडे (वय ३१, रा. बहिरेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, घराच्या जागेच्या कारणावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संशयित सुभाष हा कंपाउंडचे बांधकाम टेरेसला चिकटून करीत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता, वडिलांना ढकलून दिले. जाब का विचारला म्हणून मलाही धक्काबुक्की करून मारहाण केली.
 

 

Web Title: In Bihareshwar, crimes committed by two families are mutual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.