बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

By admin | Published: November 8, 2015 11:03 PM2015-11-08T23:03:26+5:302015-11-08T23:38:23+5:30

पतंगराव कदम : आटपाडीत दुष्काळाचा आढावा

Bihar's betrayal of trust | बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

बिहारमध्ये जनतेच्या विश्वासघाताचे पडसाद

Next

खरसुंडी : बिहार राज्याचा निकाल हा मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेल्या खोट्या अश्वासनांचा आणि जनतेच्या विश्वासघाताचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरसुंडी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.
आटपाडी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. नेलकरंजी येथील सभागृहाचे व खरसुंडी येथील विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, जनेतचा मतप्रवाह बदलत असून, भविष्यात कॉँग्रेसप्रणित सरकार देशात व राज्यात येणार आहे. तरी कार्यक र्त्यांनी मरगळ झटकून जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊन रस्त्यावर उतरावे. आपण पालकमंत्री असताना जनतेसाठी व जिल्ह्यातील विकासासाठी निधी कधी कमी पडू दिला नाही. म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना पूर्ण करून शेतीच्या पाण्यासाठी टंचाई निधीतून निधी उपलब्ध करून दिला. सध्याचे युती सरकार निधीसाठी टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढवला जात असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी मोहनकाका भोसलेंसारख्या नेत्यांची उणीव भासत आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने तालुक्यातील तलाव बांधण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील अनेक तलाव, बंधारे बांधले गेल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांचाच वारसा जयदीप भोसले चालवत असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही कदम यानी यावेळी केले.
प्रास्ताविक शशिकांत देठे यांनी केले. यावेळी युवक कॉँग्रेसचे राजू मोरे, प्रदीप पाटील, राहुल गायकवाड, विजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या रुक्मिणीताई यमगर, पार्वती पुजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)


राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकार उदासीन
आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांबाबत स्थायी आदेश शासनाने काढले होते. बजेटची चिंता न करता उपाय योजनांवर आणि मदतीसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सध्याचे सरकार दुष्काळाबाबतीत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही, असे कदम यावेळी म्हणाले.

Web Title: Bihar's betrayal of trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.