बिल हजारात वसुली लाखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:41+5:302021-06-24T04:17:41+5:30
रूकडी माणगाव : एका कोरोनाबाधित महिलेचे उपचारार्थ वैद्यकीय बिल लाखात वसूल करणेत आले असून प्रत्यक्षात बिल हजारो रुपयांचे देण्यात ...
रूकडी माणगाव : एका कोरोनाबाधित महिलेचे उपचारार्थ वैद्यकीय बिल लाखात वसूल करणेत आले असून प्रत्यक्षात बिल हजारो रुपयांचे देण्यात आलेचे घटना घडले असून रुग्ण मयत आणि पैसे ही गेले अशी अवस्था या कुटुंबाची झाली आहे. तक्रार दाखल करावे तर बिल हजारात आणि शल्यविशारद व वैद्यकीय विभागातील साटेलोट्यामुळे बाधित रुग्ण तक्रारीऐवजी मानसिक त्रास सहन करत आहे.
येथील कर्करोगावार उपचार करणारे हे रुग्णालय कोरोना संसर्गात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले.
या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना लागणारे औषधे येथील औषधालयात खरेदी करण्याची सक्ती व रेमडेसिविर औषधे काळ्या बाजारात कोठून खरेदी करायचे याची व्यवस्था रुग्णालयात परिचारक करून देत ज्यादा पैसे उकळल्याची घटना घडले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांस लागणारे औषधे रुग्णांच्या नातेवाईक याना आणावयास सांगून जे औषधे वापरले त्याचा तपशील ते दररोज द्यायचे, पण रेमडेसिविर औषधे वापरल्याचे सांगून माहिती नंतर द्यायचे असा प्रकार घडला असून प्रत्यक्षात ते औषधे वापरले किंवा नाही या घटनेचा तपशील समोर येत नसल्याचे माहिती मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी दिले.
रुग्ण दाखल करण्यापूर्वीच ९५ हजार बिल आकारण्यात आल्याचे व या बिलाबाबत कोणतेही तक्रार नसल्याचे लेखी लिहून घेतल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याचे ही सांगितले. तसेच औषधांसह उपचाराचे बिल चार लाख रुपये रोख घेऊन प्रत्यक्षात ९५ हजराचे बिल हातात देण्यात आले असून मगच प्रेत ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली आहे.
अशा घटना रुग्णालयातील शल्यविशारद शल्य कमी करणेऐवजी यमदूत बनत असून अशा घटना या वैद्यकीय व्यवसायात जलद पैसे मिळविण्यासाठी कुटीरोद्योग व्यवसाय प्रमाणे व्यवसाय होत आहे. रुग्णालय आड मुन्नागिरी करून वैद्यकीय क्षेत्र बदनाम करणारे वैद्यकीय विभागातील मुन्नगिरीच्यावर कठोर उपाययोजना करण्याचे गरज आहे.