‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील : नरके

By admin | Published: October 1, 2015 12:14 AM2015-10-01T00:14:40+5:302015-10-01T00:39:11+5:30

कुंभी कारखाना सभा : मात्र साखरेच्या दरावर एफआरपी देण्याचे धोरण ठरविणार

Billed as 'FRP': Hell | ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील : नरके

‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास बांधील : नरके

Next

कोपार्डे : शेतकऱ्यांना उचित व लाभधारक मूल्य (एफआरपी) प्रमाणे दर मिळालाच पाहिजे. एफआरपीप्रमाणे दर देण्यास कुंभी-कासारी कारखाना बांधील आहे. मात्र, भविष्यात साखरेच्या दरावर एफआरपी कशी द्यावयाची याचे धोरण ठरविले जाईल, असे ‘कुंभी’चे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रतिपादन केले.
‘कुंभी’च्या कार्यस्थळावर ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शामराव गोधडे व संचालक उपस्थित होते. ही सभा तब्बल चार तास चालली.
आपल्या प्रास्ताविकात आमदार नरके म्हणाले, या हंगामात एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांची २६४० प्रतिटनाप्रमाणे सर्व देणी अदा केली आहेत. यावेळी एफआरपीचा दर साखरेच्या दराशी निगडित असावा, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर एफआरपी व साखर दर यामधील असणारा फरक शासनाने अनुदान स्वरूपात द्यावा, असे मत मांडले.
यावेळी बाजीराव खाडे यांनी पाळीपत्रक विस्कळीत झाल्याने मागील वर्षीपेक्षा यावर्षी उताऱ्यात घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याला कारखाना सुरू असताना निर्माण झालेले तांत्रिक दोषही कारणीभूत आहेत, असा आरोप केला. यावेळी आमदार नरके यांनी यावर्षी जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीने उताऱ्यात परिणाम झाल्याचे सांगितले.
यावेळी नफा-तोटा पत्रकावरून बाळासाहेब खाडे, राजू सूर्यवंशी यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी आमदार नरके यांनी कुंभी-कासारीचे नक्तमूल्य ४६ कोटी ३७ लाख रुपये अधिक असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी कर्जाचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. आमदार नरके यांनी १९५ कोटी कर्ज दिसत असले तरी चालू जिंदगी १७४ कोटी ५३ लाख असल्याचे सांगितले. यामध्ये सहवीज प्रकल्पाचे ८८ कोटी कर्ज असले, तरी हे फेडण्यासाठी सात वर्षांची मुदत आहे. या हंगामातील सहवीज प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून १८ कोटी ७५ लाखांची वीज विक्री करण्यात आली असून, यातून दहा कोटी कर्जाच्या मुद्दलीतील, तर नऊ कोटी व्याज भागविले आहे. त्यामुळे सहवीज प्रकल्प फायद्यातच आहे, असे सांगितले. अखेर विरोधकांचे कर्जाच्या आकड्यावर समाधान झालेच नाही. आमदार नरके यांनी मात्र हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जाचा बागुलबोवा विरोधक तयार करीत असल्याचा आरोप केला.
यावेळी पी. जी. पाटील व अ‍ॅड. प्रकाश देसाई यांनी कारखाना फायद्यात असेल, तर एफआरपी एकरकमी जाहीर करा, असे आवाहन केले. पी. जी. पाटील यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी आमदार नरके यांनी जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या बाबतीत अशीच भूमिका ठेवा, अन्यथा कुंभी एफआरपीसाठी बंद व इतर कारखाने सुरू, असे झाल्यास आपल्याच कारखान्याचा तोटा होणार
आहे. एकरकमी एफआरपीसाठी शासनाबरोबर लढा उभारण्यास मीही तुमच्या बरोबर आहे, असे सांगितले.

सभा कुंभीची, चर्चा इतर कारखान्यांची
सभा अत्यंत चर्चात्मक सुरू असताना इतर कारखान्यांचे अहवाल सादर करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण तयारीनिशी असणाऱ्या आमदार नरके यांनी माल खरेदीत आपणच कमी असल्याचे अहवालात सिद्ध केले.
संदीप नरके जमिनीवर
प्रत्येक सर्वसाधारण सभेत संदीप नरके सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसत होते. यावेळी त्यांनी ‘ना सत्ताधाऱ्यांत, ना विरोधात’ बसत थेट समोर बसलेल्या सभासदांच्यात भारतीय बैठक मारली. यावेळी आमदार नरके यांनीही त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी फोन केला. मात्र, त्यांनी खुर्चीवर बसण्यास नाकारले.

Web Title: Billed as 'FRP': Hell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.