रंकाळा तलावावरील पक्षी वैभव, जैववैविध्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:21 AM2019-03-04T00:21:09+5:302019-03-04T00:21:13+5:30

- डॉ. मधुकर बाचूळकर रंकाळ्याजवळील इराणी खणीजवळ ‘अमृत योजने’तील वृक्षलागवड, महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. या ठिकाणीही लागवड केलेल्या वृक्षरोपांमधील ...

Birds on the Rangala lake, threat to bio-diversity | रंकाळा तलावावरील पक्षी वैभव, जैववैविध्य धोक्यात

रंकाळा तलावावरील पक्षी वैभव, जैववैविध्य धोक्यात

Next

- डॉ. मधुकर बाचूळकर
रंकाळ्याजवळील इराणी खणीजवळ ‘अमृत योजने’तील वृक्षलागवड, महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. या ठिकाणीही लागवड केलेल्या वृक्षरोपांमधील अंतर अगदी कमी आहे. या ठिकाणी सिमेंटचा पदपथ तयार करण्यासाठी महानगरपालिकेने तेथील नैसर्गिकपणे वाढलेल्या ‘बाभूळ’ व ‘सफेद खैर’ या वृक्षांची तोड केली आहे. या परिसरात अनेक पाणपक्षी असून हा भाग पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास आहे.
बाभूळ व सफेद खैर या वृक्षांवर प्रामुख्याने मैना, गप्पीदास, बुलबुल, दयाळ, खाटीक, माशीमार, सुगरण इ. २५ प्रकारचे पक्षी अवलंबून असतात. या झाडांवर ते वावरत असतात. या वृक्षांवर आढळणारे कीटक या पक्ष्यांचे खाद्य आहे. रात्रीच्या विश्रांतीसाठी हे पक्षी या वृक्षांचा वापर करतात. या काटेरी वृक्षांमुळे या पक्ष्यांचे शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण होते. इराणी खणीच्या परिसरातील हे वृक्ष तोडल्याने या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
वेळूतला दंगेखोर ‘वटवट्या’, ‘धान’, वटवट्या, ब्लिथचा वेळूतील वटवट्या पायमोज वटवट्या हे परदेशांतून स्थलांतर करून येणारे पक्षी या दोन्ही प्रकारच्या झाडांवर हिवाळ्यात (डिसेंबर-जानेवारी महिन्यांत) वावरत असल्याच्या पक्षी अभ्यासकांच्या नोंदी आहेत. या वृक्षांच्या तोडीमुळे वरील स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनक्रमावर परिणाम होणार आहे.
इराणी खणीजवळ असणाऱ्या निसर्ग निरीक्षण केंद्रासमोरच्या रीडस्मध्ये गेल्या वर्षीपर्यंत ‘रेखांकित बटन लावा’ हा पक्षी आढळत असे. पण यावर्षी अमृत वृक्षलागवड योजनेतील वृक्षरोपे लावण्यासाठी या भागात मोठा हस्तक्षेप करण्यात आला असून, तेथील झुडपे, गवत काढून सपाटीकरण करण्यात आले आहे. या सर्व हस्तक्षेपामुळे ‘रेखांकित बटन लावा’ या पक्ष्याने या वर्षी रंकाळ्याचा अधिवास सोडला आहे व इतर पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येऊ लागले आहे.
या परिसरात सिमेंटचे पदपथ तयार केल्यास तेथील तापमानात वाढ होणार आहे. जमिनीवर असणारे नैसर्गिक खाद्य व कीटक तेथील पक्ष्यांना उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनक्रमावर विपरीत परिणाम होणार, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे या परिसरात सिमेंटचे पदपथ करू नयेत. रंकाळा परिसरात पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास असणाऱ्या जागेवर कोणतेही विकास व सुशोभीकरण प्रकल्प राबवू नयेत, कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. महापालिकेने येथील पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास व नैसर्गिकपणे वाढलेले वृक्ष नष्ट करण्यापूर्वी वृक्ष व पक्षी अभ्यासकांचा सल्ला घेणे आवश्यक होते. नवीन वृक्षरोपांची लागवड करताना पक्ष्यांना आकर्षित करणाºया वृक्षरोपांची लागवड करणे गरजेचे होते; पण महापालिकेने असे काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
महापालिकेने ‘वृक्ष प्राधिकरण समिती’ कार्यरत आहे. वृक्षांची तोड करण्यापूर्वी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. इराणी खण परिसरातील बाभूळ, सफेद खैर या वृक्षांची तोड करण्यापूर्वी महापालिकेने सम्तिीची मंजुरी घेतली होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. मंजुरी न घेता वृक्षतोड केलेली असल्यास महापालिकेसही दंड होणे आवश्यक आहे. महापालिकेने अद्यापही शहर परिसरातील वृक्षगणना केलेली नाही. याबाबतही पर्यावरण समिती, जैवविविधता समिती फक्त कागदावर व कार्यरत आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
रंकाळा तलावाच्या काठावर वाढणाºया पाणवनस्पती (जलपर्णी / केंदाळ सोडून) तेथील अनेक जिवांसाठी महत्त्वाच्या आहेत. असंख्य कीटक यांवर अवलंबून असतात. तेथील अन्नसाखळीतील या पाणवनस्पती प्रमुख घटक आहेत. तेथील पक्ष्यांचा जीवनक्रम या पाणवनस्पतींवर अवलंबून आहे. पक्ष्यांचे अन्न, त्यांचे वावरणे, वीण करणे, त्यांच्या पिल्लांचे वाढणे, विश्रांती घेणे, आजूबाजूच्या धोक्यांपासून सुरक्षित राहणे, हे सगळे येथील पाणवनस्पतीवर अवलंबून आहे. याशिवाय त्यांचे जगणेच अशक्य असते. रंकाळ्यावर आढळणाºया पक्ष्यांच्या एकूण १३९ प्रजातींच्या पक्ष्यांपैकी सुमारे ६५ प्रजाती या येथील पाणवनस्पतींवर अवलंबून आहेत. या पाणवनस्पती नष्ट झाल्यावर रंकाळ्यातील निम्मी जैवविविधता नष्ट होईल. यामुळे या पाणवनस्पती जपल्या पाहिजेत. रंकाळा स्वच्छतेच्या गोंडस नावाखाली या मौल्यवान पाणवनस्पतीची नष्ट करून नयेत.
रंकाळ्यावरील अमर्यादित हस्तक्षेपामुळे तेथील जैवविविधता, पक्षिवैभव वेगाने नष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. रंकाळ्याचे फक्त सुशोभीकरण वाढले आहे. पण जैवविविधता मात्र कमी झाली आहे. याकामी विशेष प्रयत्न व महापालिकेचे योग्य सहकार्य आवश्यक आहे.

Web Title: Birds on the Rangala lake, threat to bio-diversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.