गेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:26 AM2019-09-09T11:26:29+5:302019-09-09T11:35:51+5:30

गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने जन्मदात्याचाच भीषण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता बेळगाव शहराचे उपनगर काकती येथील सिद्धेश्वर नगर येथे घडली आहे.

Birthday pieces taken from mobile while playing game | गेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडे

गेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडे

Next
ठळक मुद्देगेम खेळताना मोबाईल काढून घेतला म्हणून जन्मदात्याचे केले तुकडेबेळगाव उपनगरातील घटना, आईला ठेवले कोंडून

बेळगाव : गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने जन्मदात्याचाच भीषण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता बेळगाव शहराचे उपनगर काकती येथील सिद्धेश्वर नगर येथे घडली आहे.

रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. नंतर त्यांनी मुलाचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल काढून घेतत्यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील विळी घेऊन वडिलांचे तीन तुकडे केले.

रघुवीर कुंभार असे वडिलांची हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तीन वेळा तो डिप्लोमा परीक्षेत नापास झाला असून कामधंदा न करता तो घरातच बसून होता. वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असे असून ते जिल्हा सशस्त्र दलात पोलीस होते. तीन महिन्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा धारधार विळीने वडिलांचे तीन तुकडे केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धड आणि शीर वेगळे करत लेकाने बापाचा खून केला आहे. यावेळी त्याने आईला दुसºया खोलीत कोंडून ठेवले होते.

आजची तरुण पिढी मोबाईल गेमच्या इतकी आहारी गेली आहे, की जन्मदात्या पित्याचाच खून करण्यास ती मागेपुढे पहात नाही. बेळगावातील या घटनेने पालकांसमोर गंभीर समस्या उभी केली आहे.

Web Title: Birthday pieces taken from mobile while playing game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.