पिसाळलेल्या कुत्र्याचा ३५ जणांना चावा

By admin | Published: October 12, 2015 12:25 AM2015-10-12T00:25:03+5:302015-10-12T00:25:28+5:30

कुत्र्याला ठेचून मारले : घिसाड गल्ली, मटन मार्केट, सोमवार पेठ परिसरात धुमाकूळ

The bitten dog bites 35 people | पिसाळलेल्या कुत्र्याचा ३५ जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा ३५ जणांना चावा

Next

कोल्हापूर : पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सायंकाळी घिसाड गल्ली, मटन मार्केट, सोमवार पेठ या परिसरात अक्षरश: धुमाकूळ घालत ३५ जणांचा चावा घेत त्यांना जखमी केले. या धुमाकुळाने भयभीत झालेल्या नागरिकांनी रात्री उशिरा त्या कुत्र्याला काठीने ठेचून ठार मारले. जखमी झालेल्या नागरिकांनी उपचारासाठी सीपीआर येथील श्वानदंश विभागात गर्दी केली होती. जखमींमध्ये ३५ जणांचा समावेश आहे. त्यांतील २४ जणांची नावे उपलब्ध झाली. त्यांमध्ये अनीशा काझी (वय १९, कोल्हापूर), सानिका लोंढे (६, चिकोडी), सूर्यकांत नलगे (६०, कोल्हापूर), जयसिंग पाटील (५३, कोल्हापूर), गुरफान शिकलगार (६, कोल्हापूर), (पान १ वरून) श्रेया दळवी (५, कोल्हापूर), संकेत चाळके (१८, कोल्हापूर), अजय उंडाळे (१८, कोल्हापूर), शिवराज जुडगे (१२, कोल्हापूर), समृद्धी चव्हाण (८, कोल्हापूर), शाहरूख खान (१६, कोल्हापूर ), लक्ष्मण मीना (४०, कोल्हापूर), मीना लोट (५८, कोल्हापूर), धनश्री कांबळे (६०, शिवाजी पेठ, कोल्हापूर), सानिका पोवार (८, आर. के. नगर, कोल्हापूर), धालू बडके (६५, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर ), अजिज कवठेकर (४५, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), आनंदा लांडगे (५०, शिवाजी पेठ, कोल्हापूर), पंकज धरपती (कोल्हापूर), मारुती दाभोळे (३८, दसरा चौक, कोल्हापूर), संजय पाटील (४१, वडणगे, ता. करवीर), नीलेश ढबे (३५, दसरा चौक), राजेश विश्वकर्मा (३०, दसरा चौक, कोल्हापूर), शिव बच्चन (३०, शाहूपुरी, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने चावा घेतलेले जखमी एकाच वेळी ‘सीपीआर’मध्ये आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. जखमीना श्वानदंश विभागात लस टोचून घेण्यासाठी पाठविण्यात आले. यांना अ‍ॅँटी रॅबीज लस देऊन उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Web Title: The bitten dog bites 35 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.